गुन्हे शाखा
गुन्हे शाखाचे मुख्य कार्य प्रतिबंध, तपासणी आणि तपास करणे आहे
गुन्हे शाखेच्या अंतर्गत युनिट्स
प्रकटीकरण शाखा
संपुर्ण गुन्हे शाखा (प्रकटीकरण) हे प्रकटीकरण शाखाचे प्रभारी आहेत. गंभीर गुन्हयांचे तपासावर देखरेख ठेवणे आणि संघटित गुन्हेगारीला तोंड देण्यासाठी नवीन धोरणे तयार करणे.
खंडणी विरोधी पथक
संघटित गुन्हेगारीकडून खंडणीकरीता आलेल्या काॅल संबधातील प्रकरणाचा निपटारा करणेकरीता गुन्हे शाखेतील विशेष विभाग आहे.
खंडणी विरोधी पथक कार्यालय पत्ता :
तळमजला, स्टोन बिल्डिंग,
पी.एन.ऑफिस जवळ, पिकेट क्रॉस रोड,
काळबादेवी, मुंबई - 400 001
दूरध्वनी क्रमांक : 022- 2262 5154
प्रतिबंधक शाखा
- एमपीडीएच्या प्रस्तावांची तपासणी करणे, हद्दपारी आदेश तयार करणे आणि मा. पोलीस आयुक्त यांची मंजुरी प्राप्त करुन चौकशीसाठी पोलीसस्टेशनकडे परत पाठवणे.
- हद्दपारीचे आदेशावर शासनाची मंजूरी मिळवणेकरीता अहवाल सादर करणे.
- हद्दपार करण्यात येणाया व्यक्तीस सल्लागार समितीच्या समोर सादर करणे आणि प्रतिज्ञापत्र तयार करणे.
- राज्य आणि केंद्र सरकारकडून कॅफेपोसा च्या आदेशांपासून सूट.
- मुख्य संगणक कक्ष.
- प्रतिबंधक गुन्हे शाखा.
- दोषसिद्धी दर्शक केंद्र.
- न्यायालयीन कक्ष.
- हरवलेल्या व्यक्ती संबंधी केंद्र.
- गुन्हे कार्यप्रणाली केंद्र.
- गुन्हे अभिलेख शाखा.
- अंगुली मुद्रा केंद्र.
- अनुसूचित जाती जमाती कक्ष.
गुन्हे कार्यप्रणाली केंद्र.
हि शाखा अटक आणि शिक्षा झालेल्या आरोपीचे नोंदी ठेवते. हया नोंदीचे आरोपींचे कार्यपध्दतीनुसार ( कार्यपध्दतीचे प्रकार, गुन्हा करण्याची विशिष्ट पध्दत ) वर्गीकरण केले जाते.
गुन्हेगारांचा फोटो पिडीतांना आणि साक्षीदारांना दाखविला जातो.
जर एकादया गुन्हेगारांची नोद नसल्यास, पोलीस कलाकार आणि संगणक शाखाचे मदतीने त्याचे रेखाचित्र तयार केले जाते.
गुन्हे कार्यप्रणाली केंद्र कार्यालय पत्ता :
मा. पोलीस आयुक्त यांचे कार्यालय आवार,
अॅनेक्स - I बिल्डिग, पहिला मजला,
दादाभाई नौरोजी मार्ग, मुंबई - 400 001.
दूरध्वनी क्रमांक : 022- 22620111 Ext.222
हरवलेल्या व्यक्ती संबंधी केंद्र.
ही शाखा हरविलेल्या व्यक्तीचे प्रकरण हाताळते, मग ती व्यक्ती देशातील कोणत्याही भागातून हरवलेली असली तरी. या शाखेतील नियुक्त अधिकारी व पथक हरविलेल्या व्यक्तीस शोधण्याकरीता त्यां व्यक्तीचे नातलगांना मदत करतात.सर्वच हरविलेल्या व्यक्तीना शोधण्याचा प्रयत्न असला तरी, ही शाखा लहान मुले व स्त्रियां यांना शोधण्याकरीता विशेष लक्ष देते.
हरविलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचा प्रयत्न प्रामुख्याने खालीलप्रमाणे केला जातो :
हरविलेल्या व्यक्तीचे वर्णन पोलीस परिपत्रकात प्रकाशित केले जाते आणि बिनतारी संदेश पाठविला जातो.हरविलेल्या व्यक्तीचे वर्णन असलेले परिपत्रक त्याचे छायाचित्रसह सर्व पोलीस ठाणे जारी केले जाते.हरवलेल्या व्यक्तीचे छायाचित्र दूरदर्शनला प्रसारित करण्यासाठी पाठवली जातात ( 10” X 12” आकाराचा फोटो )अतिथीगृहे, रूग्णालये, रेल्वे स्थानके, विमानतळ, बस स्थानके, सिनेमागृह, उदयाने इ. सर्व ठिकाणी त्यांना शोधून काढण्याकरीता चौकशी केली जाते.रेल्वेचे हरविलेले व्यक्ती केंद्र येथे चौकशी केली जाते.हरवलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांच्या संमतीने हरवलेल्या व्यक्तीचे वर्णन असलेली छायाचित्रे वृत्तपत्रे, स्थानिक टीव्ही वाहिन्यांवर आणि इंटरनेटवरही प्रकाशित केली जातात
ही शाखा 24 तास कार्यरत आहे आणि जनता केव्हाही हरविलेल्या व्यक्तीचा शोध घेण्याकरीता त्यांचे सहकार्य मागू शकते.
हरविलेले व्यक्ती केंद्र कार्यालयाचा पत्ता :
१ला मजला, वाहतूक पोलीस वसतिगृह,
वाहतूक पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या मागे,
भायखळा, मुंबई ४०० ०२७
दूरध्वनी क्रमांक : 022-23725315
सायबर गुन्हे शाखा
सायबर पोलीसस्टेशनची संपूर्ण जबाबदारी सायबर गुन्हे शाखाची आहे, बीकेसी चे प्रभारी अधिकारी( सायबर पोलीस स्टेशन ), बीकेसी - ही शाखा हॅकिंग, सायबर गुंडगिरी, सायबर पोर्नोग्राफी, ई-मेल, क्रेडिट कार्ड गुन्हेगारी, सॉफ्टवेअर चाचेगिरी, ऑन-लाइन फसवणूक आणि इंटरनेट गुन्हा अन्वेषण संबंधी कारवाई करते.(अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा)
अंमली पदार्थ विरोधी शाखा
अंमली पदार्थ विरोधी शाखा ही ज्या व्यक्ती हेरॉईन, मॉंफाईन, गांजा, चरस, हशिश, कोकेन, मेफेड्रॉन, एलएसडी, केटामाईन, अँम्फेटामाईन, सारख्या अंमली पदार्थाची निर्मिती, वाहतूक, जवळ बाळगणे व विक्रीमध्ये गुंतलेले आहेत. त्यांचेविरुद्ध एन.डी.पी.एस. ऍक्ट १९८५ मधील तरतुदींनुसार कायदेशीर कारवाई करते.(अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा)
महिला अत्याचार प्रतिबंधक शाखा
महिला अत्याचार प्रतिबंधक शाखेचे प्रभारी हे त्यांचेअंतर्गत कक्ष १, कक्ष २ आणि महिला सहाय्य कक्ष यांचा समावेश होतो.
(अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा)