आधुनिक नियंत्रण कक्ष

About Us


• २९ मार्च १७८० रोजी पोलीस लेफ्टनंट कार्यालय विसर्जित करून उपायुक्त, मुंबई यांचे कार्यालयची निर्मिती करण्यात आली.
• त्यानंतर १७९३ मध्ये पोलीस उपायुक्त हे पद रद्द करून पोलीस अधीक्षक हे पद निर्माण केले गेले. श्री. सायमन हॉलिडे हे पहिले पोलीस अधीक्षक होते आणि ते १८०८ पर्यंत पदावर होते.
• १३ ऑक्टोबर, १८५६ रोजी श्री. डब्ल्यू. क्रॉफर्ड हे मुंबई शहर आणि मुंबई बेटाकरिता प्रथम पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त झाले.
• १८९६ मध्ये आयुक्त कार्यालय हे अंग्लो-गॉथिक पुनरुत्थान इमारतीत हलविण्यात आहे, जे अद्यापपर्यंत वास्तव्यास आहे. मुंबई पोलिस मुख्यालयाची इमारत हि वारसावास्तू म्हणून संरक्षित आहे. 
• स्वातंत्र्यानंतर, मुंबई पोलिस दलात अनेक बदल झाले. १५ ऑगस्ट १९५७ रोजी श्री. एस.एस. भरूचा हे मुंबई पोलिसांचे पहिले भारतीय प्रमुख बनले.
• १९६९ चे स्वातंत्र्यदिनी मुंबई पोलीस नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला. 
• उपलब्ध नोंदीनुसार, २६ जानेवारी १९५७ रोजी महाराष्ट्रचे मुख्यमंत्री श्री वाय.बी. चव्हाण यांनी अधिकृतपणे नवीन मुंबई शहर पोलीस नियंत्रण कक्ष उघडण्यात आले. 
• सन २००५ मध्ये, मुख्य नियंत्रण कक्ष हा संगणकीकृत प्रणालीसह आधुनिकीकरण करण्यात आला आणि आयएसओ ९००१: २००० हे मानांकन प्रमाणकंन २५/१०/२००५ रोजी प्राप्त झाले.
• सन २०१७ मध्ये, मुंबई शहर पर्यवेक्षण प्रकल्पाच्या अंतर्गत मुख्य नियंत्रण ककक्षाचे पुन्हा आधुनिकीकरण करण्यात आले आणि मुंबई शहरातील १५०० पेक्षा अधिक स्थानांवर ४७०० पेक्षा अधिक सर्वात अत्याधुनिक कॅमेरे स्थापित करण्यात आले आहेत.

डायल १०० ( नागरिकांकरिता ) 
डायल १०३ ( महिला व मुले ) 
डायल १०९० ( वरिष्ठ नागरिक ) 
दूरभाष - २२६३३३३३ ( दक्ष नागरिक ) 
मुंबई शहर सेवा प्रकल्प (सीसीटीव्ही) 
७७३८१३३१३३ आणि ७७३८१४४१४४ (एस.एम.एस. सेवा )