• एसएमएस द्वारे तक्रार करा
    ७७३८१३३१३३ , ७७३८१४४१४४
  • वाहतूक व्हाट्सऍप हेल्पलाइन
    ८४५४९९९९९९
  • ज्येष्ठ नागरिक हेल्पलाईन
    १०९०
  • पोलीस नियंत्रण कक्ष
    १००
  • महिला हेल्पलाईन
    १०३
  • सायबर हेल्पलाईन
    २६५०४००८ , १९३०
slider-img
slider-img
slider-img
slider-img
slider-img
slider-img
बातम्या


पोलीस आयुक्तांच्या लेखणीतून


श्री. देवेन भारती, भा.पो.से., पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई.

मुंबई आहे स्वप्नांचे शहर. सतत कामात असणारे ऊर्जावान महानगर! कोणत्याही संकटाला धैर्याने सामोरे जाणारे हे एक अद्वितीय महानगर आहे. मुंबई पोलीस या शहराची ही संस्कृती कायम राखतील आणि त्यासाठी सतत कार्यरत राहतील. मुंबईत कायमच कायद्याचे राज्य राखताना प्रामाणिकपणे न्याय व्हावा, प्रत्येक नागरिकाला या महानगरात सुरक्षित वाटावे, सन्मानाने जगता यावे आणि त्याच्या भावनांची दखल घेतली जावी, यासाठी काम करणे ही मुंबई पोलीस आपली जबाबदारी मानतात.

सर्व समाजात एकोपा नांदावा, समाजात शांतता असावी आणि गुन्हेगारीला पायबंद बसावा; यासाठी मुंबई पोलीस दल प्रयत्नांची पराकाष्ठा करीत राहील. नागरिकांचे जीवन सुखरूप आणि सुरळीत असावे, याकरिता रस्ते वाहतूक नियंत्रित करण्यापासून ते संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यापर्यंत आणि नव्याने उभी राहणारी आव्हाने पेलण्यापर्यंत सर्व बाजूंनी पोलीस दल सतत दक्ष राहून कर्तव्य बजावत राहील.

सुरक्षा ही केवळ आमची जबाबदारीच नाही; तर हे आम्ही दिलेले वचन आहे.
मुंबई पोलीस सदैव तुमच्यासोबत आहेत आणि कायमच तुमच्यासाठी आहेत!

देवेन भारती, भा.पो.से.,
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई.

उपक्रम


initiativesimg

१९३० सायबर हेल्पलाईन, गुन्हे शाखा, मुंबई

सायबर गुन्हेजागृती बरोबरच बृहन्मुंबई शहरातील नागरिकांना सायबर फसवणुकीच्या तक्रारी नोंदवणे सोपे व्हावे तसेच सायबर फसवणुक झालेल्या प्रकरणांमध्ये नागरिकांना तात्काळ प्रतिसाद देऊन फसवणुक झालेली रक्कम गोठण्याकरिता गृहमंत्रालयामार्फत भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र (I4C) शी संलग्न १९३० सायबर हेल्पलाइन सेवा सुरू करण्यात आली आहे.

...अधिक वाचा

गुंतवणुकदारची बैठक

गुंतवणूकदार उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी पोषक वातावरण तयार होण्यासाठी सर जे जे मार्ग पोलीस ठाणे वपोनि यांच्या आॅफीस मध्ये गुंतवण्ुकीदारची मीटीग घेण्यात आली.गंुतवणूकदार उद्योजकांच्या अडचणींचे निराकरण करण्यात आले.

...अधिक वाचा

बेटी बचाओ बेटी पढाओ उपक्रम

बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमामुळे लिंगभेद चाचणी पध्दतीने प्रतिबंध करण्यासाठी तसेच मुलीचे संरक्षण आणि शिक्षणाला प्रोत्साहन देण्याबाबत फलकासंहित महीला पोलीस अधिकारी यांची बाईक/सायकल रॅली कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.दर रॅली ही जे जे मार्ग पोलीस ठाणे येथुन सुरू होउन जे जे जंक्शन ,मोहमद अली रोड,दोन टाकी जंक्शन,भेंडी बाजार,डंकन रोड,जे जे रोड या ठिकाणी ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’, मुलगी शिकली प्रगती झाली,भुणहत्या पापा आहे.,गर्भलिंगन तपासणी कायदयाने गुन्हा आहे.अशा प्रकारच्या घोषणा देउन सदर कार्यक्रम राबविला.

...अधिक वाचा

मुंबई पोलीस सायबर शील्ड

मा. पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई श्री. विवेक फणसळकर यांचे संकल्पनेतून सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करण्यासाठी 'मुंबई पोलीस शील्ड' हा उपक्रम दि. ०७ फेब्रु., २०२४ रोजी सुरू करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करणे तसेच सायबर गुन्ह्यांविरोधातील उपाययोजना बळकट करण्यासाठी १,००० अतिरिक्त पोलीस अंमलदार पोलीस ठाणे स्तरावर प्रशिक्षित करणे आणि नागरिकांना सायबर गुन्ह्यांबाबत जागृत करून सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध करणे/आळा घालणे हा आहे.

...अधिक वाचा