गुन्हे प्रकटीकरण कक्ष

About Us


पो.उ.आ. (प्रकटीकरण) हे संपुर्ण गुन्हे शाखाचे प्रभारी आहेत. गंभीर गुन्हयांचे तपासावर देखरेख ठेवणे आणि संघटित गुन्हेगारीला तोंड देण्यासाठी नवीन धोरणे तयार करणे. 

या शाखेमार्फत खून, खूनाचा प्रयत्न, शीब आणि खंडणी, अंमली पदार्थ संबंधित गुन्हे, अंडरवर्ल्ड टोळी आणि संगठित गुन्हेगारी, जबरी चोरी, दरोडा इत्यादी गंभीर गुन्ह्याबाबत चौकशी आणि तपासणी केली जाते. याचे कारणास्तव, उपरोक्त नमूद गुन्ह्याचे तपासकामी, तपास कामात प्राविण्य असलेल्या, समर्पित पोलिसांची टीम आवश्यक आहे.

खंडणी विरोधी पथक

हे गुन्हे शाखेतील एक खास कक्ष आहे, जो संघटित गुन्हेगारीकडून खंडणीकरीता आलेल्या मागणी संबधातील प्रकरणाचा निपटारा करणेकरीता संबंधित आहे. पो.उ.आ. ( प्रकटीकरण ) यांचे मार्गदर्शनाखाली हे कार्य करते. . 

खंडणी विरोधी पथक कार्यालय पत्ता :
तळमजला, स्टोन बिल्डिंग,
पी.एन.ऑफिस जवळ, पिकेट क्रॉस रोड, 
काळबादेवी, मुंबई - ४०० ००१
दूरध्वनी क्रमांक : ०२२- २२६२ ५१५४