History


- १६६९

मुंबई पोलीस: उत्पत्ती – प्रथम ऑंगियर, भंडारी द्वितीय

बाल्यावस्थेपासून गौरवशाली आणि सामर्थ्यशाली झालेल्या अनेक महान संस्थांप्रमाणे, बृहन्मुंबई पोलीस दलाचे सामान्य बिजापासून मोठ्या वटवृक्षा मध्ये रुपांतर झाले. भंडारी समुदायाच्या ताडी व्यवसाय करणाऱ्या पुरुषांचा समावेश असलेल्या मुंबईतील पहिल्या पोलीस दलाचे ईस्ट इंडिया कंपनीमार्फत व्यवस्थापन केले जात होते.

मुंबई शहर पोलीस दलाचा इतिहास १६६९ पासूनचा आहे, ज्यामध्ये अंदाजे ५०० सामान्य पुरुषांच्या भंडारी मिलीशियाचा समावेश होता. मुंबई शहरांची सात बेटे हि दलदलीने वेढलेली होती. इ.स.१६६१ मध्ये इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा यांचा पोर्तुगालच्या राजाची राजकन्या कॅथ्रीन ऑफ ब्रागांझा यांच्याशी राजकीय-वैवाहिक संबंधाच्या अनुषंगाने पोर्तुगीजांनी इंग्रजांना हा अव्यवस्थितपणे विखुरलेला आणि विशेषतः नैसर्गिक बंदरांमुळे बुडालेला दुर्लक्षित प्रदेश भेट म्हणून दिला होता. मुंबईच्या बेटांची हि भेट ब्रिटीश-पोर्तुगीज यांच्या संबंधात गोडी वाढवणारी ठरली, ज्यामुळे डच आणि फ्रेंचांना ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यातील समुद्र किनार्यांवर वसाहती बनविण्यास सोयीस्कर झाले. पण हि भेट दिली गेल्यानंतर असा संसर्गित आणि बेलगाम प्रदेश शोधणे कठीण होते. या प्रदेशात संसर्ग पसरविणारे डास, चोरी आणि दरोडेखोरी हे दिनक्रम होते.

मुंबई पोलीस: उत्पत्ती – प्रथम ऑंगियर, भंडारी द्वितीय

- १६७२

मुंबई : प्रारंभी

गव्हर्नर गॅराल्ड ऑंगियर (१६७२-१६७७) यांच्या मते व्यापारी फायद्यांमुळे आणि नैसर्गिक बंदर असल्यामुळे मुंबई हे सूरतपेक्षा ईस्ट इंडिया कंपनीचे मुख्यालय होण्यासाठी एक चांगले ठिकाण होते. हे हस्तांतरण सन १६८६ मध्ये केले गेले.

ऑंगियर यांची समजूत होती की मुंबई शहर हे देवाच्या सहाय्याने उभारणे संकल्पित होते आणि त्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात योगदान दिले. शहराची तटबंदी मजबूत करण्यात आली, किल्ल्यांच्या सभोवताली खंदक खोदण्यात आले, किल्ल्यांवर नवीन बुरुज बांधण्यात आले आणि त्यावरील तोफखाना वाढवण्यात आला, एक आरमारी तळ स्थापन करण्यात आला, बंदरे वाढविण्यात आली, सैनिकी शिबंदी (गॅरीसन) वाढविण्यात आली, सायन आणि शिवडी या किल्ल्यांचे मजबुतीकरण करण्यात आले आणि सन १७७० मध्ये सेंट जॉर्ज हा नवीन किल्ला बांधण्यात आले.

इंग्रजी कायदे आणि न्यायालये स्थापन करण्यात आले आणि न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली, जहाज बांधणीकरिता भागभांडवल उभारण्यात आले, टांकसाळ स्थापित करण्यात आले आणि एक रुपयाचे नाणे पहिल्यांदा बनवले गेले.     ऑंगियर यांनी मेंडहॅम पॉईन्ट येथे दगडी ईमारत बांधण्याची शिफारस केली, जिथे सध्या महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक यांचे कार्यालय आहे.

१८४९ मध्ये तत्कालीन बॉम्बे सरकारनेज आयोजीत केलेली  प्रथम जनगणनेची कारवाई करण्यासाठी मुंबई पोलिसांचे महत्त्वपूर्ण काम केले. पोलीस अधीक्षक कॅप्टन ई. बेनेस यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

मुंबई : प्रारंभी

- १७१५

पुनरुत्थान करून सात बेटे एकत्रित करण्यात आली

सॅम्युएल टी. शेपर्ड यांनी १९३० च्या आपल्या पुस्तकात मुंबई शहराला “पुनरुत्थान करण्याचे महान महाकाव्य - जे सुमारे अडीच शतकांपासून प्रगतीपथावर आहे आणि ज्याचा शेवट एवढ्यात दिसत नाही” असे वर्णन केले आहे.

सात बेटांचे एकत्रीकरण करून निर्माण झालेल्या एका मोठ्या बेटामुळे मुंबईचा उदय झाला आहे. जमिनीच्या पुनर्वसनाने विकासासाठी नवीन जागा दिली. मुख्य सात बेटांमधील मूळतः दलदलीच्या या क्षेत्राला 'फ्लॅट्स' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जमिनीवर सध्याच्या मध्य मुंबईचा भाग बनलेला आहे. परंतु मोठ्या भरतीच्या वेळेस हे क्षेत्र समुद्राच्या पाण्यामुळे संपूर्णपणे डूबले जात आहेत,त्यामुळे मुख्य बेटांचा एकमेकांशी संबंध तुटतो. या भागामध्ये नारळाची झाडे वाढल्यामुळे आणि स्थानिक रहिवाश्यांनी तेथे माशांचे खत घातल्यामुळे तसेच वाळलेल्या पानांमुळे ही दलदल गलीच्छ् बनले होते.

या कालावधीतील प्रमुख पुनरुत्थानांपैकी एक म्हणजे हॉर्न्बी वेलार्ड (हाजी अलीसमोरील भाग). यामुळे बेटाचे उल्लेखनीयपणे बदल झाले. १७१५ मध्ये चार्ल्स बूनने या कामाची सुरुवात केली आणि महालक्ष्मी येथे झालेल्या मोठ्या भगदाडामुळे तात्पुरते पुनरुत्थान केले, ज्याने वरळीपासून मुंबई बेट वेगळे केले होते. परंतु वेलार्डचे वास्तविक बांधकाम (मूळ पोर्तुगीज शब्द “वेल्लोडो” अर्थ कुंपण) गव्हर्नर विलियम हॉर्नबी यांच्या अधिपत्याखाली १७७१ ते १७८४ च्या दरम्यान झाले.

या वेलार्डने उत्तर व दक्षिण मुंबई दरम्यान निर्णायक जोडणी झाली आणि मध्य भागात शेतीसाठी आणि वसाहतीसाठी जमीन उपलब्ध झाली. यामुळे बेटाच्या पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील बाजू देखील जोडल्या गेल्या.     सन १८०५ मध्ये सायन कॉजवे मुख्य बेटाला जोडणारा मार्ग बांधण्यात आला आणि सन १८३८ मध्ये कुलाबा कॉजवे पूर्ण झाल्यानंतर, सात बेटे एकमेकांशी जोडले गेले.

पुनरुत्थान करून सात बेटे एकत्रित करण्यात आली

- १८५५

चार्ल्स फोर्जेट

पोलीस अधीक्षक, मुंबई / पोलीस उप आयुक्त / हंगामी पोलीस आयुक्त (1855-1863)

मुंबई शहरास चार्ल्स फोर्जेट सारखा सर्वात स्वतंत्रपणे विचार करणारा पोलीस अधिकारी मिळाला, जो आधुनिक काळातील सम्राट अकबर प्रमाणे वेश बदलून रस्त्यावर जाऊन सामान्य जनतेची मते जाणून घेणारा आणि संभाव्य बंडाबाबत माहिती मिळवीत असे. भारतात लहानाचे मोठे झाले असल्याने त्यांना स्थानिक रितीरिवाजांबाबत व्यक्तिगत माहिती होती आणि तेथील भाषांचे ज्ञान होते. त्यांच्या शारिरीक वैशिष्ट्यांनी त्यांना मदत केली; सन १९०९ ते १९१६ कालावधीतील मुंबईचे पोलीस आयुक्त एस. एम. एडवर्डस आयसीएस यांनी त्यांना "काळे केस आणि गव्हाळ रंग" असे वर्णीले होते. यांच्या पोलीस प्रमुख पदाच्या कार्यकाळातच ईस्ट इंडिया कंपनीच्या पायास हादरा बसविणाऱ्या १८५७ च्या क्रांतीचा उदय झाला. त्यामुळे उत्तर भारतात आणि बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तपात आणि हत्याकांड सुरु असताना फोर्जेट यांनी मुंबई शहरात शांतता कायम ठेवली होती. कदाचित हे या शहराच्या निहित व्यावसायिक वृत्तीमुळे राजकारणातील अडथळे टाळण्याच्या वृत्तीनेदेखील होते, परंतु फोर्जेट यांनी असंतोषाची थोडीशी कुजबुजही सहन केली जाणार नाही याबद्दलचा आपला संदेश त्यांनी सर्वाधिक अचूक मार्गाने प्रसारित केला होता.

दिवाळीच्या काळात मुंबई शहराला दारूगोळ्याच्या सहाय्याने उडवून देण्याचा भारतीय क्रांतिकाऱ्यांचा कट उघडकीस आल्यामुळे, फोर्जेट यांनी दोन मुख्य क्रांतिकाऱ्यांना अटक करून तोफेच्या तोंडी बांधले. १५ ऑक्टोबर, १८५७ रोजी मरीन बटालियनचा कवायत हवलदार सईद हुसेन आणि १० व्या स्थानिक भारतीय रेजिमेंटचा शिपाई मंगल गुडरे या दोघांना सध्या आझाद मैदान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोकळ्या जागेवर (एस्प्लनेड) जमलेल्या मोठ्या जनसमुदायासमोर तोफेच्या तोंडी उडवून चिंधड्या केल्या. त्याच्याकडे असा कठोरपणा असला तरीही फोर्जेट हा त्याच्या उच्च गुणवत्तेच्या पोलीसी कामामुळे भारतीयांमध्ये प्रशंसनीय होता. त्याने बीट पद्धती, रात्रीची गस्त आणि ईतर कार्यपद्धती अंमलात आणल्या. जर कोणा अधिकाऱ्याने स्थानिक जनतेशी गैरवर्तन केले किंवा कोणाकडून लाच मागितली तर फोर्जेट अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करीत असे. जगन्नाथ शंकरशेठ यांच्यासारख्या एक अग्रगण्य व्यावसायिक आणि परोपकारी नेते ज्यांच्यावर निंदनीय स्वारस्य असलेल्या युरोपीय लोकांनी राजद्रोहाचे खोटे आरोप केले होते, त्या आरोपातून दोषमुक्त केल्यामुळे फोर्जेटचे भारतीयांमध्ये वेगळे स्थान होते.

 

चार्ल्स फोर्जेट

- १८५५

१८५६ चा XIII वा कायदा : पोलीस दलाचे व्यावसायिकरण

भारतीय विधान परिषदेने १८५६ चा XIII वा कायदा पास केला. ( १३ जून १८५६ रोजी भारताच्या गव्हर्नर जनरलची मान्यता प्राप्त झाली. )

१८२९ पासून १८५५ पर्यंत, वरिष्ठ दंडाधिकारी, एक कनिष्ठ दंडाधिकारी व पोलीस अधीक्षक हे बॉम्बे सिटीचे पोलीस प्रशासनास  जबाबदार अधिकारी होते, ज्यांना कधीकधी त्यांना उप सहायक मदतीस होते. कॉन्स्टेबल म्हणून ओळखले जाणारे अधीक्षक सामान्यतः कॅप्टनच्या दर्जाचे सैनिकी अधिकारी होते आणि बहुधा पूर्वी त्यांना पोलिसांच्या कामाचा अनुभव नव्हता.

१८५५ मध्ये चार्ल्स फोर्जेट, पोलिस उपायुक्त, मुंबई शहराचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांच्या नियुक्तीने मुंबई शहरातील व्यावसायिक पोलीस अधिकारी प्रशासनाचा प्रारंभ केला. १८५६ चा XIII वा कायदा पास करून, फोर्जेट यांचेस स्थान  बळकट करण्यात आले. त्यानंतर त्यांनी पोलीस दल पूर्णपणे ताब्यात घेतले; त्यांच्या कणखर व्यक्तिमत्त्वाच्या प्रभावाखाली, पोलिसांचे मनोबल वाढले आणि गंभीर गुन्हेगारीमध्ये लक्षणीय घट झाली.

 

१८५६ चा XIII वा कायदा : पोलीस दलाचे व्यावसायिकरण

- १८५६

विल्यम क्रॉफर्ड, पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस दंडाधिकारी. (१८५६ - १८६४)

१४ जून १८५६ रोजी, १८५६ च्या XIII व्या कायद्याने पोलीस आयुक्त या पदाची निर्मिती केली गेली. विल्यम क्रॉफर्ड यांना मुंबई शहर व बेटांसाठी पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले होते, तसेच १ नोव्हेंबर, १८५६ पासून पोलिसांचे वरिष्ठ दंडाधिकारी म्हणून आपले कर्तव्य बजावत होते. चार्ल्स फोर्जेट आणि डब्ल्यू. एच. जी. डनलॉप यांना उप आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले. १८५० च्या दशकात पोलिसांनी त्यांची नागरिकांप्रती गुन्हेगारी आणि कायदा व सुव्यवस्था कर्तव्ये यापलीकडे विस्तारित अनेक कार्ये केली. १८५५ च्या खराब मान्सूनने, मुंबई सरकारला जलसंकट निवारण करण्यासाठी सर्व स्रोतांचे उपयोजन करण्यास उद्युक्त केले. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी क्रॉफर्ड यांना सर्व सार्वजनिक टाक्या आणि विहिरींचे प्रभारी म्हणून नेमण्यात आले. १८६३ पर्यंत त्यांनी पोलीस आयुक्त म्हणून काम केले आणि अखेर १३ डिसेंबर १८६४ रोजी इंग्लंडमध्ये रवाना झाले. या काळात चार्ल्स फोर्जेट यांनी पोलीस आयुक्त म्हणून काम केले.

विल्यम क्रॉफर्ड, पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस दंडाधिकारी. (१८५६ - १८६४)

- १८६०

पायधुनी पोलीस ठाणे

पायधुनी पोलीस ठाणे: मुंबईतील सर्वात जुने पोलीस ठाणे - १८६०

पायधुनी पोलीस ठाणे

- १८६४

सर फ्रँक सूटर, के.टी., सीएसआय - पोलीस आयुक्त, मुंबई (१८६४ - १८८८)

१४ डिसेंबर, १८६४ रोजी फ्रॅंक हेन्री सूटर नावाच्या ३३ वर्षीय अधिकाऱ्याला पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले, ज्यांचा पोलीस आयुक्त म्हणून, २४ वर्षे पूर्ण इतक्या प्रदीर्घ कारकिर्दीचा कारकीर्द विक्रम अद्याप कायम आहे पण अधिक महत्वाचे म्हणजे ते वेगाने विस्तारणाऱ्या शहरामध्ये पोलिसांच्या मानकांचे निर्धारण करण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या मनुष्यबळांसाठी पुरेसे गृहनिर्माण आणि साफसफाईची कमतरता ही सतत चिंताजनक बाब होती.

दक्षिणेकडील मराठा क्षेत्र आणि धारवाड येथील विद्रोह्यांना दडपून टाकण्याच्या उत्कृष्ट सेवेमुळे सूटर यांची निवड झाली. १८५७ च्या भारतीय विद्रोहांच्या क्रूरतेनंतर ब्रिटिश, अद्यापपर्यंत दुर्बल राहिले होते, चार्ल्स फोर्जेट आणि फ्रँक सूटर सारखे पुरुष हे नवीन नायक होते.

सर फ्रँक सूटर, के.टी., सीएसआय - पोलीस आयुक्त, मुंबई (१८६४ - १८८८)

- १८८०

पोलीस आयुक्त, मुंबई यांचे भायखळा येथील कार्यालय : १८८०-१८९९

पोलीस आयुक्त, मुंबई यांचे भायखळा येथील कार्यालय  : १८८०-१८९९

- १८९५

सशस्त्र पोलीस: अनिश्चितता हाताळण्यासाठी सुसज्ज

१८९५ मध्ये पोलीस आयुक्त आर एच व्हिन्सेंट यांच्या कार्यकाळात मुंबई पोलिसांच्या सशस्त्र शाखेची स्थापना करण्यात आली. हे समजून घेणे गरजेचे आहे कि, मुंबई पोलीस हे लंडन पोलिसांवर आधारित होते, ज्यांचे बॉबी पोलीस केवळ एक लाठीसह सशस्त्र असल्याने प्रसिद्ध होते, त्यामुळे सशस्त्र शाखेची आवश्यकता होती.

१८९३ मध्ये, पायधुणी येथील हनुमान मंदिरावर हल्ला करण्यात आला आणि सर्वात वाईट हिंदू-मुस्लिम दंगलीने शहराला विभागले गेले. या तणावात भर म्हणून, लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश मंडळाची परंपरा सुरू केली होती, जेथे ब्रिटीशविरोधी विधाने उघडपणे प्रदर्शित केले जात होते.

परिस्थिती सतत हाताबाहेर जात होती. आणि पोलिसांना याची जाणीव झाली की त्यांना मदत करण्यासाठी ते नेहमीच सैन्याला पाचारण करू शकत नाहीत. यामुळे सशस्त्र पोलिसांची स्थापना झाली. पोलीस शिपाई मार्टिनी हेन्रीस या ठासणीच्या रायफलने सुसज्ज होते, जिचा वापर विखुरलेल्या अनियंत्रित जमावावर पशु मारण्याच्या गोळीने बेछूट गोळीबार करण्यासाठी केला जात असे. तथापि, या शस्त्रांवर त्यांच्या लहान श्रेणी आणि अचुकतेच्या अभावासाठी देखील टीका करण्यात आली, कारण अनेक निष्पाप लोकांना विनाकारण पशु मारण्याच्या गोळीने मारण्यात आले होते. शेवटी ते रायफल बदलण्यात आले.

ही शाखा मूलतः भायखळा येथील पोलीस मुख्यालयातील छावणीत होती व तेथेच त्यांना प्रशिक्षण दिले गेले. आणि नंतर क्रॉफर्ड मार्केटमध्ये हलविण्यात आले. १९२४ पर्यंत, सशस्त्र पोलीस मुख्यालयाच्या स्थापनेसाठी नायगांव विकास योजनेत मोठ्या प्रमाणावर जमीन अधिग्रहित करण्यात आली. क्वॉर्टर-गार्डने अविरतपणे शस्त्रे सुरक्षित केली आहेत. त्या पुढील वर्षी, घाटकोपर येथील ग्रेट इंडियन द्वीपकल्प ( पेनिन्सुला )  रेल्वेचे ( ऑक्झीलरी फोर्सेस इंडिया ) गोळीबार मैदान ( फायरिंग रेंज ) पोलिसांना देण्यात आले. पण शहरापासून खूप दूर असल्याने बहुतेक पोलीस इतका प्रवास करण्यास नाखूष होते.

सशस्त्र पोलीस: अनिश्चितता हाताळण्यासाठी सुसज्ज

- १८९६

पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांचे मुख्य कार्यालय, मुंबई

पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांचे मुख्य कार्यालय हे लोकमान्य टिळक मार्ग (कर्नाक रोड) आणि डॉ दादाभाई नौरोजी मार्ग (हॉर्नबी रोड) च्या जंक्शनवर स्थित आहे. क्रॉफर्ड मार्केटकडे दर्शनी भाग असलेली भव्य व सुंदर ईमारत, आर्किटेक्ट जॉन अॅडम्सने पिवळ्या मालाड दगड वापरून धर्मनिरपेक्ष व्हिक्टोरियन गॉथिक शैलीमध्ये संरचना आराखडा तयार केला होता. नोव्हेंबर, १८९४ मध्ये बांधकाम सुरू झाले आणि ते २४ डिसेंबर, १९८६ रोजी पूर्ण झाले.

सर फ्रँक सॉउटर यांनी बांधकामाची मूळ जागा निवडली कारण ती भायखळा येथील जुन्या पोलीस कार्यालयापेक्षा अधिक सोयीस्कर होती आणि लोकप्रिय उत्सवाच्यावेळी आणि दंगलसदृश परिस्थितीमध्ये जादा कुमक पाठविण्यास लक्ष केंद्रित करत येऊ शकेल. तथापि, इमारती तयार होण्यापूर्वी सर फ्रँक सॉउटर निवृत्त झाले आणि १८९९-१९०१ दरम्यान या ईमारतीत पहिले पोलीस आयुक्त म्हणून बसण्याचा मान हार्टली केनेडी, सीएसआय यांना मिळाला. १८९६ च्या शेवटी इमारत तयार झाली असली तरी ९  जानेवारी, १८९९ रोजीपासून केनेडी नवीन ईमारतीत बसू लागले.

पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांचे मुख्य कार्यालय, मुंबई

- १९१९

स्वातंत्र्य चळवळ आणि मुंबई पोलीस

१९१९ हे वर्ष शहरातील सर्वात अस्थिर वर्ष होते जेव्हा रस्त्यावर सतत गोंधळ उडालेला असे. अन्याय्यकारक रौलेट कायद्याविरुद्ध आंदोलन, गांधीजींनी सुरू केलेले सत्याग्रह आणि खिलफत आंदोलन, मिल्समध्ये सुरु असलेली औद्योगिक अस्थिरता बंदरे आणि इतर कारखान्यांमध्ये वाढली, जालियानवाला बाग हत्याकांडाचा प्रभाव, इ. मुळे - पोलीस आयुक्त आणि त्याच्या माणसांना उसंत मिळणार नाही, याची खात्री पटली.

त्यांच्या विपत्तींमध्ये भर म्हणून, द बॉम्बे क्रॉनिकलचे संपादक आणि खूप प्रेमळ प्रतिमा, बी. बी. हॉर्निमन यांना  देशातून हद्दपार करण्याचा निर्णय घेतला गेला. हॉर्निमन यांच्या हद्दपारी मुळे शहर-व्यापी हरताळ करण्यात आले. घोडेस्वार ( माउंटेड)  पोलीस नेहमीच रस्त्यावरील आंदोलन आणि प्रक्षुब्ध निषेध थांबवण्यासाठी सतत कार्यरत होते. घोडेस्वार ( माउंटेड)  पोलीसांच्या विध्वंसामुळे -  ज्यांना सत्याग्रह्यांच्या गर्दीत जाण्याचा आदेश देण्यात आला होता -  फ्रान्सिस सी. ग्रिफिथ, ओबीई, आयपी (नंतर सर फ्रान्सिस)  पोलीस आयुक्त ( १९१९ - १९२१ ) यांना असामान्य अभ्यागत द्वारे बोलावण्यात आले.

अहिंसक जमावावरील घुसखोर हल्ल्याचा निषेध करण्यासाठी महात्मा गांधी स्वत: पोलीस मुख्यालयात आले. ग्रिफिथने मात्र त्यांना स्पष्ट विरोध केला. गांधी-आत्मचरित्र "माझे सत्याचे प्रयोग" मध्ये गांधी-ग्रिफिथ बैठकीचे वर्णन पुनरुत्पादित केले गेले आहे.

 

स्वातंत्र्य चळवळ आणि मुंबई पोलीस

- १९४५

मुंबई शहर पोलीस बृहन्मुंबई पोलीस बनले - १ ऑक्टोबर १९४५

१ ऑक्टोबर १९४५ हा मुंबई पोलिसांच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस आहे. या दिवशी बृहन्मुंबई ची स्थापना करण्यात आली. मुंबई शहर (कुलाबा ते माहीम आणि व्हीटी ते सायन), मुंबई उपनगर जिल्हा (वांद्रे, सांताक्रूज, अंधेरी, कुर्ला आणि घाटकोपर) येथे एकत्रीकरण करण्यात आले. पोलीस ठाण्यांची संख्या विनाविलंब १८ ते २३ पर्यंत वाढली. उपनगरीय जिल्हा हा १९२० मध्ये अवाढ्य अशा ठाणे जिल्ह्यातून बनविण्यात आला आणि मुंबई प्रांताचे पोलीस महानिरीक्षक यांच्या अंतर्गत बृहन्मुंबई हे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली होते. त्यानंतर, संपूर्ण बृहन्मुंबई पोलीस आयुक्तांच्या ताब्यात होते, जे आता म्हणून ओळखले जात होते. हैप्पी ई. बटलर यांनी हे पद प्रथम धारण केले.

मुंबई शहर पोलीस बृहन्मुंबई पोलीस बनले - १ ऑक्टोबर १९४५

- १९४७

जे एस. भरूचा, आयपी ( १५ ऑगस्ट १९४७ - १५ मे १९४९ )

स्वतंत्र भारतात मुंबईचे पहिले पोलीस आयुक्त सुरतच्या श्रीमंत पारसी कुटुंबातून आले आणि ऑक्सफर्ड येथे शिक्षित झाले. त्यांच्या मागील नियुक्त्यां मध्ये गोध्रा, बिजापूर आणि लर्काना, सिंधसारख्या दूरच्या ठिकाणांचा समाविष्ट होतो.

पोलीस आयुक्त म्हणून काम करण्याच्या काही महिन्यांच्या आतच, त्यांना एक गुन्हा हाताळावा लागला, ज्यामुळे नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताची हानी झाली : महात्मा गांधीचा खून. राष्ट्रपित्यांवर जरी दिल्लीत गोळीबार केला असला तरी मुंबई प्रांतात गूढ कट रचला गेला होता. अन्वेषण थेट जे. डी. नगरवाला, आयपी, पोलीस उपायुक्त, विशेष शाखा, मुंबई यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आले.

भरूचा, एक बॅचेलर, निवृत्त होऊन पुणे येथे स्थायिक झाले; जेथे ते प्रिन्स ऑफ वेल्स ड्राईव्ह ( नेहरू  मार्ग ) वर त्यांच्या बंगल्यात रहात असत. ते एक श्वानप्रेमी होते; ते त्यांच्या बऱ्याच श्वानप्रेमी मित्रांसोबत व काही ग्रेट डेन्स या जातीच्या श्वानांसह राहिले.दुःखद गोष्ट म्हणजे, कुत्र्याच्या चाव्यामुळे १९७७ साली त्यांचा मृत्यू झाला.

 

जे एस. भरूचा, आयपी ( १५ ऑगस्ट १९४७ - १५ मे १९४९ )

- १९४९

एम. एम. चुडासामा, आयपीएस ( १९४९-१९५५ )

स्वतंत्र भारतातील पोलिसांचे सर्वात मोठे सेवा बजावणारे आयुक्त हे एक राजपूत होते आणि ते पूर्वी मुंबई प्रांतात पुणे येथे डी.आय.जी., सी.आय.डी. होते. १९५१ च्या मुंबई पोलीस कायद्यातील तरतुदी प्रमाणे बृहन्मुंबई पोलीस व मुंबई जिल्हा पोलीस यांचे ११ जून रोजी एकत्रीकरण करण्यात आले. पुणे येथील पोलीस महानिरीक्षक सर्वंकश प्रमुख बनले. त्यांच्या पोलीस आयुक्त कार्यकालानंतर, त्यांना मुंबई राज्याचे पोलीस महानिरीक्षक म्हणून नेमण्यात आले ( १९५६ नंतर 'प्रांत' ही संज्ञा 'राज्य' ने बदलली ). त्याचा मुलगा नाना चुडासामा हे मुंबईचे माजी शेरीफ असून सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय व्यक्ति आहे.

एम. एम.  चुडासामा, आयपीएस ( १९४९-१९५५ )

- १९५१

मुंबई पोलीस अधिनियम - १९५१

१९५१ च्या मुंबई पोलीस कायद्याची अंमलबजावणी ११ जून रोजी करण्यात आली होती. हा अधिनियम मुंबई जिल्हा पोलीस आणि मुंबई शहर पोलीस यांना एकत्रितपणे लागू करण्यात आला, पोलीस महानिरीक्षक हे मुख्य प्रमुख होते. यापुढे मुंबई पोलीस आयुक्त हे मुख्य प्रमुख नव्हते, आता ते पोलीस महानिरीक्षकांच्या अधीनस्थ होते.

चुडासमा आयपी ( १९४९ -१९५५ ) या नवीन वितरणांमध्ये पोलीस आयुक्त होते आणि श्री. एन. एम. कामटे ओ.बी.ई., आयपी. हे मुंबई राज्याचे पुणे येथे प्रथम पोलीस महानिरीक्षक बनले आणि अशाप्रकारे ते या कायद्याच्या तरतुदीनुसार मुंबई शहर पोलीस आणि मुंबई जिल्हा पोलीस या दोन्हींचे प्रमुख बनले.

मुंबई पोलीस अधिनियम - १९५१

- १९५९

श्वान पथक: पोलीस दलाचे सर्वात चांगले मित्र

श्वान पथकाचे प्रथम सदस्य कुमार, बिन्दो आणि राजा हे श्वान होते – १९५९ मध्ये बरियाच्या महाराजा यांनी डॉबरमन पिंसर क्लब ऑफ इंडिया यांच्या मार्फतीने तीन डॉबरमन पिंसर या वंशाची कुत्य्राची पिल्ले भेट दिली होती. ही पिल्ले खूपच लहान आणि खेळकर होती, परंतु जेव्हा ते योग्य वयात आले त्यावेळी तीन प्रशिक्षकांची नियुक्ती करून त्यांना योग्य प्रशिक्षण देण्यात आले. त्या सर्व पिल्लांना बासिल केन यांनी प्रशिक्षण दिले होते.

बासिल केन हे गुन्हे शाखेमध्ये पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होते आणि त्यांच्याकडे पोलीस श्वान पथकाची जबाबदारी सोपविण्यात आली. (त्यांची पोलीस उप आयुक्त पदापर्यंत बढती झाली). केन यांना श्वानांना हाताळण्याचे प्रशिक्षण घेण्याकरिता ब्रिटनला पाठविण्यात आले होते आणि स्कॉटलंड यार्डच्या डॉग ट्रेनिंग सेंटरच्या देखरेखीखाली त्यांनी मेजर या अल्शेसियन प्रजातीच्या श्वानास प्रशिक्षित केले होते. त्यांनी मेजर यास मुंबईस आणले होते. मेजर या श्वानाने  गोरेगावच्या आरे कॉलनी येथील खुनाच्या गुन्हा उघडकीस आणण्यास मोलाची मदत केली होती. या श्वानास गुन्हेगाराने घटनास्थळी सोडलेले शर्ट आणि लुंगी हुंगण्यास दिली होती. त्यावेळी मेजरने  आरोपीचा मागोवा घेत जवळील वस्तीतील झोपडीत जाऊन तेथे असलेल्या पत्र्याच्या पेटीजवळ उभा राहून जोरजोराने भुंकू लागला. जेव्हा ती पत्र्याची पेटी उघडली असता, त्यामध्ये सारख्याच धोब्याचे चिन्ह असलेले शर्ट आणि लुंगी सापडली. परंतु न्यायालयाला मेजर श्वानाचा मागोवा घेण्याच्या कौशल्यांबाबत माहिती देण्यासाठी नायालयासाठी विशेष सादरीकरणाची व्यवस्था केली गेली.

श्वान पथक: पोलीस दलाचे सर्वात चांगले मित्र

- १९७०

अंडरवर्ल्ड: एक क्रूर आणि वाईट इतिहास

१९७० च्या दशकाच्या मध्यात माफियाने गैरकृत्याचा कळस गाठला होता. हा काळ असा होता की, जेव्हा अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तान, करीम लाला आणि वरद राजन मुदलीयार ही नावे सर्वश्रुत झाली होती. हाजी मस्तान आणि करीम लाला यांनी लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या उपस्थितीत शपथ घेऊन त्यांचे समाजविरोधी आणि बेकायदेशीर कृत्यांबद्दल निंदा केली.

१९८० च्या दशकात हाजी मस्तान राजकारणात प्रवेश केला आणि स्वत:च्या पक्षाचे विस्थापन केले. करीम लाला यांना अपयश आले: तो आजारी वयोवृद्ध झाला, त्याचा भाऊ रहीम याची गोळी मारून हत्या करण्यात आली आणि त्याचे पुतण्याची कुख्यात शुटर समद खान, याची देखील हत्या झाली. वरद राजन मुदलीयारला मद्रासला पळून जाण्यास भाग पाडले गेले, जेथे त्याने शेवटचा श्वास घेतला.

परंतु हा माफिया सिंडिकेटचा शेवट नव्हता. १९८०  च्या दशकात दाऊद इब्राहिम, अरुण गवळी आणि अमर नाईक यांच्या रूपात तरुण रक्ताने  लवकरच आपली उपस्थिती दाखविली. हे तिघेही अंडरवर्ल्ड जगतामध्ये जितकी लालसा होती तेवढे त्यांचे क्षेत्र वाढवीत होते. त्यांच्या गँगने प्रतिस्पर्ध्यांच्या क्षेत्रात शिरकाव करण्यासाठी, विरोधकांना संपवण्यासाठी  किंवा जुन्या वादातून निर्दयी सशत्र/बंदूकधारकांना जवळ करीत – आणि यातूनच भाडोत्री मारेकऱ्यांचा उदय झाला. आणि जेव्हा त्यांनी दुष्कृत्ेप सुरु केली तेव्हा रक्ताचे पाट वाहू लागले, बऱ्याचदा चांगल्या कामासाठीही रक्त रस्त्यावर सांडू लागले.

अंडरवर्ल्ड: एक क्रूर आणि वाईट इतिहास

- १९७६

पहिली महिला पोलीस - श्रीमती परवानी, सहाय्यक पोलीस आयुक्त - १९७६

१९३९ मध्ये प्रतिबंधक शाखा स्थापना झाली. त्याच्या मुख्य कारवायांपैकी मद्य वाहक आणि विक्रेत्यांना हे एक होते, आणि त्यापैकी अनेक महिलांना आघाड्यांवर म्हणून वापरले जात होते. संपूर्ण शहरामध्ये परिचारिका उपस्थित करणे अशक्य होते आणि पूर्णवेळ महिला शोधकर्त्यां असणे गरजेचे होते. परिणामी, एक्स विभाग ( प्रतिबंधक विभाग ) यामध्ये २५ महिला शोधकर्त्यांना, २५ रुपये प्रति महिना वेतन आणि मोफत निवासी सुविधा देऊन नियुक्त करण्यात आले, हा प्रयोग यशस्वी झाला आणि महिला कॉन्स्टेबल ( शिपाई ) हे पद निर्माण करण्यात करण्यात आले. तो युद्धाचा काळ होता आणि पोलिसांवर टाकलेले ओझे अनेक पटींनी वाढले होते, त्यामुळे अधिकच्या हातांचे स्वागतच केले गेले.

ए. के. कॅफिन हे शेवटचे ब्रिटीश पोलीस आयुक्त होते. ज्यांनी प्रथम महिला पोलीस अधिकाऱ्यांची आवश्यकता शासनाला लेखी व्यक्त केली होती, परंतु त्याबद्दल काही करण्याआधीच ते निघून गेले.

स्वातंत्र्यानंतर, एन. एम. कामटे मुंबई प्रांताचे, पहिले पोलीस महानिरीक्षक बनले. एके दिवशी, त्याने आपल्या आठवणींमध्ये नोंद केल्याप्रमाणे, त्यांनी एक आक्रमक जुलूसचा सामना करावा लागला; तेव्हा त्यांचे कॉन्स्टेबल ( शिपाई ) त्यांच्या बाजूने उभे राहून निमूटपणे सर्व पाहिले. त्यांना चप्पलांचा भडिमार करण्यात आला  तरीसुद्धा त्यांनी काहीही केले नाही. कारण: तो संपूर्ण महिला मोर्चा होता. या घटनेचा पोलीस महानिरीक्षकांवर अपेक्षित परिणाम झाला होता: त्याची परिणीती म्हणून काही धष्टपुष्ट महिलांची नेमणूक करण्यात केली आणि त्यांना प्रशिक्षित केले गेले.

पहिली महिला पोलीस - श्रीमती परवानी, सहाय्यक पोलीस आयुक्त - १९७६