GRAS प्रणाली


विषय - परवानाधारकांना परवाना शुल्क GRAS प्रणालीद्वारे परस्पर बॅकेत भरण्याबाबत.

संदर्भ - शासन प.क्र. एमआयएस २४१४ / प्र.क्र.१७३ / १४ / बीयुडी-१] दिनांक : ०२ / ११ / २०१४

उपरोक्त विषय व संदर्भान्वये] शासनाने जमा होणारा महसूल व महसूलेतर जमा रक्कमा इलेक्ट्रॉनिक पध्दतीने शासनाच्या तिजोरीत जमा करण्यासाठी शासकिय जमा लेखांकन पध्दती (Government Receipts Accounting System) निर्मिती केली असून] सर्व कार्यालयानी सदर प्रणालीचा अवलंब करण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे.

पोलीस आयुक्त] बृहन्मुंबई कार्यालयाच्या आस्थापनेवरील कक्ष - 10 ( शस्त्र / चित्रपट / हॉटेल ) या शाखेत संबधित अधिकृत परवानाधारकांना परवाना शुल्क भरणा करण्यासंदर्भात शासनाने निर्देषित केल्यानुसार शासनाच्या शासकिय जमा लेखाकंन पध्दती (Government Receipts Accounting System) प्रणालीद्वारे शुल्क नमूद लेखाशिर्षाखाली भरणा करण्याबाबत सुचित करण्यात येत आहे. सदर प्रणालीमध्ये शुल्क/पैसे भरण्याकरीता खालीलप्रमाणे कार्यपध्दती अवलंबवावी.

  • Google

  • GRAS ( GOVT RECEIPT ACCOUNTING SYSTEM )GRAS Payment Link.

  • आपणास User Name & Password च्या Screen वर नेईल.

  • आपण PAY WITHOUT REGISTRATION / WITH REGISTRATION याबाबतचे पर्याय उपलब्ध आहेत. त्याप्रमाणे आपण सदर वर Click करून आपली माहिती भरू शकता.

  • Department Name – COMMISSIONER OF POLICE, MUMBAI

  • आपणास GRAS प्रणालीमध्ये ज्या लेखाशिर्षाखाली पैसे भरावयाचे आहेत त्याची यादी सोबत देण्यात आली आहे.

  • सर्व परवानाधारकांना 1) e-Payment, 2) Payment Across Bank Counter, 3) SBI epay payment gateway द्वारे परवानाशुल्क भरण्याबाबत सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.

  • परवानाधारकाने GRAS प्रणालीद्वारे बॅकेमध्ये पैसे भरणा केल्यानंतर सदरची रक्कम GRAS प्रणालीद्वारे दोन/तीन दिवसांनी भारतीय रिझर्व्ह बॅकेत जमा झाल्यानंतरच संबधित परवानाधारकांचे परवाने नुतनीकरण करण्याकरीता या कार्यालयास संबधित कागदपत्रे सादर करावीत.

  • शस्त्र व दारूगोळा शाखेतील शस्त्र परवानाधारकांचे नुतनीकरणाकरीता आकारण्यात येणाल्या शुल्काबाबतची माहिती खालील नमूद केल्यानुसार आहे.

    अ.क्र. विषय वर्षाकरीता नियमित शुल्क ०१ महिन्यापेक्षा ते ०१ वर्षापर्यतचे शुल्क + उशिरा शुल्क
    १. पिस्तोल / रिव्हॉल्वर रु. १०००/- रु. २०००/-
    २. गन / रायफल रु. १५००/- रु. ३०००/-
    ३. पिस्तोल आणि गन रु. २०००/- रु. ४०००/-
    ४. पिस्तोल आणि रायफल रु. २०००/- रु. ४०००/-
    ५. रिव्हॉल्वर आणि गन रु. २०००/- रु. ४०००/-
    ६. रिव्हॉल्वर आणि रायफल रु. २०००/- रु. ४०००/-
    ७. तलवार / इतर रु. ३००/- रु. ६००/-

    ज्या परवानाधारकांचे शस्त्र परवान्याचे नुतनीकरण ०३ वर्षाच्या विहित कालावधीत झालेले नाही अश्या शस्त्र परवानाधारकांनी वर नमूद विहित परवाना शुल्क भरणा न करता संबधित कागदपत्रांसह कक्ष - १० ( शस्त्र व दारूगोळा ) शाखा या कार्यालयात पुढील कार्यवाहीसाठी जमा करावीत.


  • परवानाधारकांनी शस्त्र व दारूगोळा शाखा, हॉटेल शाखा आणि चित्रपटषाखेमधील अन्य कामकाजाबाबत संबधितांशी संपर्क साधून, परवाना शुल्क GRAS प्रणालीद्वारे बॅकेमध्ये खालील नमूद लेखाशिर्षाखाली ( SHEME NAME ) भरणा करावी. परवाना शुल्क भरताना OFFICE NAME - COMMISSIONER OF POLICE, MUMBAI असे SELECT करावे

  • अ.क्र. नाव भरणा पध्दत लेखाशिर्ष लेखाशिर्ष क्रमांक
    १. शस्त्र RECEIPT UNDER ARMS ACT OTHER COLLECTION ००५५०३८९०१
    २. चित्रपटगृह आणि हॉटेल INFORMATION & PUBLICITY FILMS RECEIPTS FROM CINEMATOGRAPH FILM RULES ००२२०००१२०१
    ३. ध्वनिक्षेपक RECEIPTS OF STATE HEADQUATERS POLICE FEES RECOVERABLE FOR LICENCES GRANTED UNDER POLICE ACT ००५५०१५५०१
    ४. स्फोटक OTHER ADMINISTRATIVE SERVICES OTHER COLLECTION ००७००८३१०१
    ५. पेट्रोलियम PETROLEUM PETROLEUM ०८०२००१२०१
    ६. पसारा OTHER RECEIPTS SERVICES FEES FOR SECURITY LICENCES ००५५०३२४०१