गुन्हे शाखा
गुन्हे शाखा, गुन्हे अन्वेषण विभागाची इमारत १९०८ मध्ये बांधण्यात आली, गुन्हे अन्वेषण विभाग १९०९ मध्ये कार्यरत झाले. पोलीस-प्रेस कक्ष त्याच्या डाव्या बाजूस कार्यरत करण्यात आले.
About Us
सह पोलीस आयुक्त ( गुन्हे ) हे मुंबई शहरातील गुन्हे अन्वेषण, शोध आणि तपासणीचे प्रभारी आहेत. त्यांच्या देखरेखीखाली गुन्हे शाखेत विविध शाखा कार्यरत आहेत. पोलीस उप आयुक्त त्या शाखांचे प्रमुख आहेत.
गुन्हे शाखेचा (सीआयडी) इतिहास : गुन्हे अन्वेषण विभाग
मुंबई पोलिसांनी ' स्कॉटलंड यार्ड नंतर द्वितीय ' असे नाव कमावले आहे, हे गुन्हे अन्वेषण विभागाच्या उत्कृष्ट तपासामुळे आहे.
१८८४ च्या आधी, योग्यरित्या व्यवस्थापित केलेला गुन्हे अन्वेषण विभाग नव्हता. सरकार गुन्हे अन्वेषणाकरिता वेगळ्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याच्या बाजूने नव्हते कारण त्यास असे वाटत होते की यामुळे आंतर-विभागीय हेवेदावे आणि बेबनाव होईल. पण पोलिसांनी या विभागात जवळच एक गुन्हे शोध शाखा सुरू केली, जी नियमित श्रेणीचा भाग होता. १८९० मध्ये गुन्हे शोध शाखेचे नाव गुन्हे अन्वेषण विभाग असे नाव बदलण्यासाठी परवानगी देण्यात आली होती, तरीही ती पोलीस दलाचा भाग राहिली. १९०८ च्या टिळक दंगलीत, ज्यामध्ये पोलिसांच्या गुप्त माहिती संकलनाची दिरंगाई कमी झाली, त्याने सरकारचा विचार बदलला. एस. एम. एडवर्डस यांनी ८ जून, १९०९ रोजी गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) स्थापन केला. गुन्हे शाखेने जुन्या डिटेक्टीव ब्रांचची जागा घेतली आणि इंपीरियल पोलिसांच्या एका अधिकार्याच्या नियंत्रणाखाली एक अभिजात संस्था म्हणून काम केले गेले. विभागीय पोलिसांना हाताळण्यासाठी विद्यमान पोलीस उप आयुक्तांना सोडून; त्यास पोलीस उप आयुक्त हा दर्जा देण्यात आला - पहिले पोलीस उप आयुक्त एफ. ए. एम. एच. विन्सेंट हे होते. चार मुख्य क्षेत्रे राजकीय, विदेशी, गुन्हेगारी आणि संकीर्ण यावर गुन्हे शाखेने काम केले, प्रत्येकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक होते. संवेदनशील, राजकीय किंवा धार्मिक स्वरुपाच्या प्रकरणांमध्ये लक्ष देणे हे त्याचे मुख्य कार्य होते आणि हे संक्षिप्तरित्या आजही चालू आहे.
सायबर गुन्हे
About Us
पोउआ (सायबर गुन्हे) हे सायबर गुन्हे शाखेचे प्रभारी आहेत. सायबर पोलीस ठाणे हे त्यांचे देखरेखीखाली काम करते. ०९ एप्रिल, २००९ रोजी सायबर पोलीस ठाणे कार्यरत झाले. ही शाखा वेबसाइट हॅकिंग, सायबर स्कॉकिंग, सायबर पोर्नोग्राफी ( बीभत्स साहित्य ), ई-मेल, क्रेडिट कार्ड गुन्हा, सॉफ्टवेअर चोरी, ऑनलाइन फसवणूक आणि इंटरनेट गुन्हा तपासणीशी संबंधित असून भा.द.वि. आणि इतर कायद्यांसह, विशेषत: माहिती तंत्रज्ञान कायदा (दुरुस्ती) २००८ अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या प्रकरणांशी तपास करतात.
सायबर पोलीस ठाणेची भूमिका / जबाबदारी :
१. सायबर गुन्हे अन्वेषण यंत्रणेतील मुंबई पोलीस कर्मचार्यांना नियमित प्रशिक्षण देणे.
२. शाळा, महाविद्यालये आणि संस्था / संघटनांमध्ये सायबर गुन्हे प्रतिबंध / जागरुकता कार्यक्रमांचे आयोजन / व्यवस्था करणे.
३. सायबर पोलीस ठाणे, मुंबई हे पोलिसांचे स्थानिक पोलीस ठाणे, गुन्हे शाखाचे कक्ष आणि इतर शाखांचे अधिकारी यांना तपासणीसाठी तांत्रिक सहाय्य देखील प्रदान करते.
४. राज्य विरुद्ध प्रतिकूल टिप्पणी किंवा दुर्भावनायुक्त टिप्पणी आढळल्यास ज्यामुळे कायदा व सुव्यवस्था समस्या उद्भवू शकतील, तेव्हा सायबर पोलीस ठाणे, मुंबई, हे संगणक आणीबाणी प्रतिसाद पथक, भारत (सीईआरटी-इन) यांना नोडल ऑफिसर हा द्वारे ( सह पोलीस आयुक्त, गुन्हे, मुंबई ) (कलम ६९ आयटी कायदा अंतर्गत ) किंवा संबंधित माननीय न्यायालयाचे आदेश प्राप्त करुन विनंती पाठवणे. न्यायालय अशा प्रकारच्या सामग्रीचे इलेक्ट्रॉनिक प्रसारण रोखेल जेव्हा वेबसाइट रजिस्ट्रार / सेवा प्रदाता हा ईमेलद्वारे केलेली विनंती स्वीकारणार नाही.
५. बाल अश्लीलता ( पोर्नोग्राफी ) आणि बलात्कार, सामूहिक बलात्कार प्रकरणे यात सायबर पोलीस ठाणे, मुंबई ही मुंबई पोलिसांना नोडल म्हणून काम करते.
अंमली पदार्थ विरोधी कक्ष
About Us
पोउआ (अंमली पदार्थ विरोधी) हे संपुर्ण अंमली पदार्थ विरोधी शाखाचे प्रभारी आहेत. ही शाखा सन १९८९ पासून सुरू झाली.
या शाखाद्वारे गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम ( एनडीपीएस) १९८५ चे अंतर्गत अंमली पदार्थ आणि हेरॉइन, मॉर्फिन, गंजा, चरस, हॅशिश ऑइल, कोकेन, मेफेड्रोन, एलएसडी, केटामाइन, अॅम्फेटामाइन सारखे मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थाची निर्मिती / वाहतूक / बाळगणे / विक्री करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जाते.
या शाखेची मुख्य जबाबदारी शहरातील अंमली पदार्थाचे निर्मिती आणि पुरवठावर नियंत्रण ठेवणे असून, जनजागृती कार्यक्रमाद्वारे मागणी कमी करणे ही आहे.
महिला अत्याचार विरोधी कक्ष
About Us
पोउआ (महिला अत्याचार प्रतिबंधक शाखा) हे महिला अत्याचार प्रतिबंधक शाखेचे प्रभारी असतात. त्यांचेअंतर्गत कक्ष १, कक्ष २ आणि महिला सहाय्य कक्ष यांचा समावेश होतो.
कक्ष १ -
बलात्कार, अपहरण, विनयभंगाचे प्रकार आणि महिलांवरिल इतर गंभीर गुन्ह्यांचा तपास तसेच सदरबाबत प्राप्त तक्रार अर्जाची चौकशी आणि निपटारा करणे.
कक्ष २ -
हुंडाबळी, हुंड्याच्या संबंधित आत्महत्या आणि हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत उद्धवणारे इतर गुन्हे, भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८ (अ) अंतर्गतचे गुन्हे तसेच कौटुंबिक हिंसाचार व हुंड्याशी निगडित इतर गुन्ह्यांचा तपास तसेच सदरबाबत प्राप्त तक्रार अर्जाची चौकशी आणि निपटारा करणे.
महिला सहाय्य कक्ष
नमूद कक्षामध्ये पती-पत्नी यांच्यातील कौटुंबिक वाद किंवा कलह संदर्भात प्राप्त तक्रार अर्जाच्या अनुषंगाने समुपदेशन करण्यात येते.
बाल सहाय्य संरक्षण केंद्र (जापू)
About Us
कलम ३१ बाल न्याय काळजी व संरक्षण अधिनियम २०१५ प्रमाणे निराधार / विनापालक आढळणाऱ्या मुले व मुलींना संरक्षणात घेऊन त्यांना बालगृह डोंगरी किंवा मानखुर्द, मुंबई येथे पोहोचते करण्यात येते. निराधार/विनापालक बालकांना बाल कल्याण समिती, डोंगरी व मानखुर्द, मुंबई यांचे आदेशान्वये त्यांचे राहते गावी / नजीकचे बालगृह येथे परत पाठवून त्यांचे पुनर्वसन करण्यात येते
हि शाखा बाल कामगार ( प्रतिबंध आणि विनियमन ) अधिनियम १९८६, कलम ३, १४ आणि बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) अधिनियम २०१५, कलम ७५, ७९ अंतर्गत बाल कामगाराची सुटका करणे. याशिवाय, मुंबई भिक्षेकरी प्रतिबंधक अधिनियम १९५९, कलम ५, ९, ११ आणि बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) अधिनियम २०१५, कलम ७, ६ अंतर्गत बाळ भिकाऱ्यांची सुटका करते.
बाल कल्याण समिती, मुंबई शहर व उपनगरे यांच्या आदेशाने कलम ९५ बाल न्याय काळजी व संरक्षण अधिनियम २०१५ प्रमाणे अल्पवयीन मुले व मुलींना महाराष्ट्रातील त्यांचे जिल्ह्यात किंवा भारतातील त्यांचे राज्यातील बाल कल्याण तसेच बालगृह यांचे संरक्षणात देण्याचे कामकाज जापू (संरक्षण) शाखेद्वारे करण्यात येते.
मानवी तस्करी विरोधी कक्ष
About Us
पोउआ (अंमलबजावणी) हे अनैतिक व्यापार प्रतिबंधक कक्षाचे प्रभारी असतात. हॉटेल, गेस्ट हाऊस, ब्युटी पार्लर, डान्स बार व कुंटणखाने या ठिकाणी चालणाऱ्या वेश्याव्यवसायांवर कारवाई करणे. तसेच कुंटणखान्यांची तपासणी करून अल्पवयीन मुलींची व जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ओढल्या गेलेल्या पीडित मुली/महिला यांची सुटका करणे.
गुन्हे प्रकटीकरण कक्ष
About Us
पो.उ.आ. (प्रकटीकरण) हे संपुर्ण गुन्हे शाखाचे प्रभारी आहेत. गंभीर गुन्हयांचे तपासावर देखरेख ठेवणे आणि संघटित गुन्हेगारीला तोंड देण्यासाठी नवीन धोरणे तयार करणे.
या शाखेमार्फत खून, खूनाचा प्रयत्न, शीब आणि खंडणी, अंमली पदार्थ संबंधित गुन्हे, अंडरवर्ल्ड टोळी आणि संगठित गुन्हेगारी, जबरी चोरी, दरोडा इत्यादी गंभीर गुन्ह्याबाबत चौकशी आणि तपासणी केली जाते. याचे कारणास्तव, उपरोक्त नमूद गुन्ह्याचे तपासकामी, तपास कामात प्राविण्य असलेल्या, समर्पित पोलिसांची टीम आवश्यक आहे.
खंडणी विरोधी पथक
हे गुन्हे शाखेतील एक खास कक्ष आहे, जो संघटित गुन्हेगारीकडून खंडणीकरीता आलेल्या मागणी संबधातील प्रकरणाचा निपटारा करणेकरीता संबंधित आहे. पो.उ.आ. ( प्रकटीकरण ) यांचे मार्गदर्शनाखाली हे कार्य करते. .
खंडणी विरोधी पथक कार्यालय पत्ता :
तळमजला, स्टोन बिल्डिंग,
पी.एन.ऑफिस जवळ, पिकेट क्रॉस रोड,
काळबादेवी, मुंबई - ४०० ००१
दूरध्वनी क्रमांक : ०२२- २२६२ ५१५४
जलद प्रतिसाद पथक
About Us
मुंबई शहर हे दहशतवादी हल्ले आणि गुन्हेगारी घटकांकडून होणाऱ्या हल्ल्यांना बळी पडण्याची शक्यता आहे. अशा प्रसंगांना प्रभावीपणे हाताळण्यासाठी आणि ओलीसांना मुक्त करण्यासाठी उच्च प्रशिक्षित, प्रवृत्त, तरुण, तंदुरुस्त आणि संपूर्णतः सुसज्ज अशी टीम असणे आवश्यक होते.
२६/११ च्या घटनेनंतर एनएसजी आणि फोर्स वनच्या धर्तीवर हे ३१ ऑगस्ट २००९ रोजीच्या शासन निर्णयाने जलद प्रतिसाद पथक स्थापन करण्यात आले असून, हे पथक दहशतवादी हल्ल्यांस आणि इतर मोठ्या सुरक्षा धोक्यांना प्रथम प्रतिसादकर्ता म्हणून कार्य करत आहे.
जलद प्रतिसाद पथक अत्यंत कमी वेळेत जलद हालचाली करून, घटनास्थळावरील सामरिक माहिती गोळा करण्यासाठी कारवाई करते आणि संभाव्य धोका निष्क्रिय करते आणि हे पथक ओलीसांची सुटका करतात. केंद्रीय सुरक्षा दलांना आणि राज्य सुरक्षा दलांना शासकीय कर्तव्यात साहाय्य प्रदान करतात.
जलद प्रतिसाद पथकाची सहा युनिट्समध्ये विभागणी करण्यात आली आहे. मुख्य जलद प्रतिसाद पथक कलिना येथे तैनात आहे. तसेच अन्य जलद प्रतिसाद पथके पाच प्रादेशिक नियंत्रण कक्ष येथे तैनात आहे (दक्षिण, मध्य, पश्चिम, पूर्व आणि उत्तर) मुख्य जलद प्रतिसाद पथक हे अपर पोलीस आयुक्त (संरक्षण व सुरक्षा) यांचे पर्यवेक्षणाखाली कार्यरत असतात. तसेच प्रादेशिक जलद प्रतिसाद पथक हे संबंधित प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त यांचे पर्यवेक्षणाखाली कार्यरत असतात.
दंगल नियंत्रण पोलीस
About Us
दंगल नियंत्रण पोलीस (आरसीपी) हे विशेषतः प्रशिक्षित पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचे पथक आहे. हे विशेष बल व्यावसायिक मार्गाने कायदा व सुव्यवस्था परिस्थिती हाताळण्यास सक्षम आहे आणि दंगलसदृश परिस्थिती कुशलतेने त्याचा सामना करण्यास सक्षम आहे, हे पथक मुंबई पोलीसांच्या शिरपेचातील मानाचा तुरा आहे.
दंगल नियंत्रण पोलीस पथकात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करण्यास सक्षम असे तरुण, कणखर आणि प्रशिक्षित पोलीस अधिकारी आणि अंमलदार कार्यरत आहेत. ते जमाव पांगवण्यात प्रशिक्षित असून या कारवाईकरिता लागणारी सर्व अत्यावश्यक उपकरणे त्यांना पुरविण्यात आलेली आहेत. त्यांना प्रथमोपचार करण्याचे देखील प्रशिक्षिण देण्यात आलेले आहे.
कोणत्याही विद्रोहास किंवा बंडाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आरसीपीच्या प्रत्येक कंपनीकडून एका प्लॅटुनला प्रतिबंधात्मक रणनीतीचे प्रशिक्षण दिले जाते आणि त्यांना "जलद प्रतिक्रिया पथक" (QRT) म्हणून विकसित केले गेले आहे.
आर्थिक गुन्हे विभाग
About Us
सह पोलीस आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा हे आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी आणि पर्यवेक्षण अधिकारी आहेत. आर्थिक गुन्हे शाखा क्लिष्ट अशा पांढरेपेशी गुन्हाचा तपास करतात उदा. सामान्य फसवणूक, बँकिंग आणि वैद्यकीय क्षेत्रातील फसवणूक, जॉब रॅकेटिंग, शेअर्स आणि बोगस स्टॅम्प केसेस.
पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी नवीन रणनीती आखणे आणि विविध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे ही आर्थिक गुन्हे शाखेची प्रमुख जबाबदारी आहे.
आर्थिक गुन्हे शाखेचे कामकाज सुरळीतपणे चालण्यासाठी खालीलप्रमाणे कक्षांची विभागणी करण्यात आलेली आहे.
• बँकिंग युनिट १ - बँकिंग संदर्भातील व्यक्तीद्वारे केलेले गुन्हे
• बँकिंग युनिट २ - बँकिंग संदर्भातील कंपन्यांनी केलेले गुन्हे
• हौसींग युनिट १ - गृहनिर्माण संदर्भातील व्यक्तीद्वारे केलेले गुन्हे
• हौसींग युनिट २ - विकासक / ठेकेदार / सरकारी संस्था यांच्या विरोधातील गृहनिर्माण संदर्भातील गुन्हे
• जनरल चिटिंग युनिट १ - खाजगी / एखाद्या व्यक्तीबाबत फसवणुकीचे गुन्हे
• जनरल चिटिंग युनिट २ - सामुदायीक गुन्हे - सार्वजनिक क्षेत्र / सरकारी संस्था यांचे संदर्भातील गुन्हे
• जनरल चिटिंग युनिट ३ - व्यवसायी व्यवहार संदर्भात घडणारे गुन्हे
• जॉब रॅकेटिंग कक्ष ४ - नोकरी व शिक्षण आणि वैद्यकीय संदर्भातील घडणारे गुन्हे
• शेअर्स युनिट कक्ष ५ - कंपनीचे शेअर्स, सिक्युरिटी मार्केट, वायदे बाजार संदर्भातील गुन्हे
• एफ.आय.सी.एन. कक्ष ६ - बनावट मुद्रांक व बनावट चलनी नोटा संदर्भातील गुन्हे
• एम.पी.आय.डी.कक्ष ७ - गुंतवणूका/ठेव योजनेसंदर्भातील फसवणुकीचे गुन्हे व एमपीआयडी कायद्यांतर्गत घडणारे गुन्हे
• प्रशिक्षण कक्ष ८ - प्रशिक्षण व शोध
• इंटेलिजन्स कक्ष ९ - गोपनीय शाखा
• प्रशासन शाखा कक्ष १० - प्रशासकीय कामकाजाच्या अंतर्भुत मालखाना व न्यायालयीन कामकाज (पैरवी)
• एम.एल.एम. कक्ष ११ - मल्टीलेव्हल मार्केटिंग संदर्भातील गुन्हे
• इंटलेक्चुअल प्रॉपर्टी युनिट कक्ष १२ - बौध्दिक संपदा हक्क संदर्भातील गुन्हे
गुन्हे शाखा नियंत्रण कक्ष
गुन्हे शाखा नियंत्रण कक्ष प्रामुख्याने अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत पारित करण्यात आलेले नियंत्रण आदेश, भारतीय प्रताधिकार कायदा १९५७, अन्न सुरक्षा आणि मानके कायदा २००६, ट्रेड मार्क ऍक्ट, औषधे आणि सौंदर्यप्रसाधने कायदा या कायद्यांमधील तरतुदीं अन्वये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास करणे.
सध्या मुंबई शहरात होणारी दूध भेसळ, प्रतिबंधित गुटखा विक्री व इतर सुगंधित तंबाखूच्या उत्पादनाची विक्री आणि तेल भेसळ, तेल चोरी ( पेट्रोलियम उत्पादने) याविरुद्ध या कक्षातर्फे प्राधान्याने कारवाई करण्यात येत आहे.
विक्रीकर कोष
मुंबई शहरात विक्रीकर कायद्यातील तरतूदीबाबत घडणाऱ्या दखलपात्र गुन्ह्यांचा तपास करण्याकरिता शासन निर्णय क्रमांक FD/STD/1277/63/77/ADM-8 दिनांक २१/०४/१९७७ अन्वये विक्रीकर कोष या शाखेची निर्मिती करण्यात आली. सध्या या शाखेकडे तपासाधीन गुन्ह्यांमध्ये व्हॅट भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या व्यापा-यांराविरुद्धच्या गुन्ह्यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
वर नमूद गुन्हे शाखा नियंत्रण कक्ष तसेच विक्रीकर कोष पोलीस उप आयुक्त, विशेष कृती दल, यांचे अधिपत्याखाली कार्यरत आहे.
वाहतूक शाखा
About Us
मुंबई वाहतूकः जुन्या आठवणी
सन १८७३ साली बॉम्बे ट्रामवे कंपनीने मुंबई शहरात घोड्यांच्या सहायाने ओढली जाणारी ट्राम सेवा प्रथमतः सुरू केली, तेव्हापासून मुंबईमध्ये वाहतुक नियंत्रणाची सुरुवात झाली होती. सन १९०७ मध्ये घोड्यांच्या सहायाने ओढल्या जाणार्या ट्रामची जागा ऑटोमोबाईल ट्रामने घेतली. जमशेदजी टाटा यांनी सन १९०१ मध्ये प्रथम मोटर कार विकत घेतली तर सन १९०४ मध्ये श्रीमती सुजन टाटा या प्रथम परवानाधारक बनल्या. प्रथम टॅक्सी सेवा सन १९११ मध्ये सुरू झाली आणि घोडा, मोटार वाहने इ. ची व्यवस्था करणारे पहिले पीएलसीएल कायदा सन १९२० मध्ये तयार करण्यात आला.
सर पॅट्रिक यांनी सन १९२४ मध्ये मुंबईतील प्रथम वाहतुक नियंत्रण कक्षाची सुरुवात केली. या नियंत्रण कक्षात १ प्रभारी निरीक्षक, ३ अधिकारी आणि १५५ अंमलदार कार्यरत होते. लोकसंख्येच्या प्रमाणात मनुष्यबळामध्ये वाढ करण्यात आली. प्रथमतः पोलीस उप आयुक्त, मुख्यालय आणि काही कालावधीनंतर पोलीस उप आयुक्त, बंदर परिमंडळ हे एमव्ही युनिटचे प्रमुख होते. की १९३५ मध्ये पोलीस उप आयुक्त (एमव्ही आणि कर आकारणी) हे पद निर्माण करण्यात आले. सन १९४० मध्ये मोटार वाहन कायदा १९३९ मंजुर करण्यात आला आणि पहिले पोलीस उप आयुक्त, वाहतुक या पदावर ई.शिही यांची नियुक्ती करण्यात आली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर एस. लिऑन हे पहिले पोलीस उप आयुक्त, वाहतुक होते. सदरचे पद सन १९५० मध्ये सहायक पोलीस आयुक्त पदी पदावनत करून सहायक पोलीस आयुक्त (वाहतुक, सशस्त्र दल, मोटार परिवहन आणि बिनतारी संदेश) अंतर्गत निश्चित करण्यात आले होते. परंतु सन १९५४ मध्ये हे पद पोलीस उप आयुक्त, वाहतुक म्हणून ---- करण्यात आले होते. सन १९६० मध्ये श्री.एम.एस.कसबेकर हे पहिले स्वतंत्र पोलीस उप आयुक्त, वाहतुक होते, सन १९८७ मध्ये श्री.पी.एस.पसरिचा हे पहिले अपर पोलीस आयुक्त पदी वाहतुक शाखेचे प्रभारी म्हणून नियुक्त झाले. सध्याचे सह पोलीस आयुक्त, वाहतूक हे पद दि.२४/०६/२००० रोजी अस्तित्वात आले. श्री.ए.एन.रॉय यांची पहिले सह पोलीस आयुक्त, वाहतुक पदावर नियुक्त करण्यात आले. प्रथमतः वाहतुक शाखेचे कार्यालय मंत्रालयाजवळ असलेल्या क्वीन बॅरक्स येथे सुरू करण्यात आले होते. सन १९८७ मध्ये सर पोचखनवाला रोड, वरळी, मुंबई येथील वर्तमान वाहतूक मुख्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री श्री.ए.आर.अंतुले यांच्या हस्ते करण्यात आले.
तांत्रिक हस्तक्षेप
• ई-चलन, सीसीटीव्ही आणि एएनपीआर कॅमेराद्वारे प्रभावी अंमलबजावणी.
वाहतुक नियंत्रण शाखेच्या कामकाजात पारदर्शकता.
• डिजिटल पेमेंटद्वारे पूर्णतः कॅशलेस व्यवहार.
• वेब पोर्टलद्वारे ना हरकत प्रमाणपत्र अर्जांची ऑनलाइन प्रक्रिया.
प्राणांतिक अपघातांमध्ये घट
ई-चलन प्रणाली: कॅमेराद्वारे पकडलेल्यास, मोबाईल/फोनद्वारे दंड
• गुन्हेगारांना एसएमएसद्वारे चालान पाठविली जातात, त्यामध्ये अपराधाची छायाचित्रे, कायद्याचे लागू केलेले कलम, देय असलेला दंड आणि ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी दुवा/लिंक समाविष्ट आहे.
• वारंवार गुन्हे करणारे आणि दंड न भरणारे यांचा शोध घेऊ शकतो.
• रोख रकमेविना आणि ऑनलाईन पद्धतीने दंडाची भरणा करू शकतो.
मुंबई वाहतुक पोलीस (एमटीपी) मोबाइल अॅप
• वाहतूक उल्लंघनाच्या घटना आणि रस्त्यांवरील वाहतुकीची चिन्हे, सिग्नल्स, गतिरोधक इ. ची सुविधा नसल्याबद्दल तक्रार करण्यासाठी एमटीपी अॅपचा वापर केला जातो.
• रिअल टाइम ट्राफिक अद्यतने. ऑनलाइन पेमेंट करणे (ई-चलन)
• नो पार्किंग झोन, एक दिशा मार्ग, इत्यादिंची माहिती
व्हीएमएस: व्हेरिएबल मेसेजिंग सिस्टम
• 36 व्हीएमएस साइन बोर्ड स्थापित करण्यात आली आहेत. संदेश प्रसारणाचे व्यवस्थापनाकरिता मध्यवर्ती सर्व्हर वाहतुक मुख्यालयात स्थापित करण्यात आला आहे.
• वाहतुक सुरक्षितता, नियम आणि इतर माहिती संबंधित संदेश प्रदर्शित केले जातात.
• वाहतुक वळविण्याविषयी, वाहतुकीची स्थिती आणि एखाद्या विशिष्ट महत्त्वाच्या ठिकाणाचे अपेक्षित अंतराबाबत व अनुमानित वेळ देखील प्रदर्शित केली जाते
ब्रेथ अनलायझार (श्वास विश्लेषक)
• पुराव्यासह श्वास विश्लेणासाठी आणि डेटा रेकॉर्डिंगसाठी जीपीएस व कॅमेरासह सहज हाताळता येणारे यंत्र
• दारू पिऊन गाडी चालविणारांस शोधण्यासाठी आणि दंड करण्यासाठी कार्यक्षम पद्धत
• शहरात २८८ ब्रेथ अनलायझार (श्वास विश्लेषक)
विशेष शाखा
About Us
विशेष शाखेचे मुख्य कार्य गुप्तवार्ताचे संकलन व एकत्रिकरण करणे आहे. सर्व प्रादेशिक व परिमंडळात उप-शाखा आहेत
विशेष शाखा - १
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील कोणत्याही भागात राष्ट्रविरोधी घटकांबाबत माहिती मिळवण्याकरीता शासन निर्णय क्रमांक एसएएस -१०/ ०३/१५/ एसबी -४ , दिनांक ८ जुलै २००४ अन्वये निर्मिती केली.
विशेष शाखा - २
पोलीस उप आयुक्त (विशेष शाखा-II) व FRRO, मुंबई हे या विभागाचे प्रमुख अधिकारी असून त्यांच्या अधिपत्याखालील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई सी-पोर्ट, जेएनपीटी, न्हावाशेवा बंदर येथील इमिग्रेशन कामकाजाची निगराणी करणे. त्या व्यतिरिक्त परदेशी नागरिक नोंदणी शाखा, परदेशी नागरिकांची नोंदणी, त्यांच्या विसा कालावधीत वाढ करणे आणि निर्गमन परवाना (Exit Permit) जारी करणे इ कामकाज केली जातात. (https://boi.gov.in
/https://indianfrro.gov.in)
परदेशी सेवा कक्ष ( परदेशी नागरिकांची चौकशी आणि त्यानंतरची कायदेशीर कारवाई जसे निर्वासन, काळी यादी तयार करणे इ. )
ओ.सी.आय. कक्ष , पारपत्र शाखा ( पोलीस पडताळणीकरीता आर.पी.ओ. आणि स्थानिक पोलीस यांच्यामधील समन्वय संस्था - www.passportindia.gov.in )
एफआरआरओ, मुंबई
एफआरएफओ ( FRRO ) कार्यालय, नोंदणी, व्हिसा ऍटस्टीशन्स, रिटर्न व्हिसा आणि पीआयओ आणि ओसीआय कार्ड्ससाठी अर्जांची प्रक्रिया करते.
एफआरओ मुंबई कार्यालय पत्ता : अंनेक्स-०२ इमारत, ०३ला मजला, बद्रुद्दीन तय्यबजी मार्ग,
सेंट जेवियर्स कॉलेज मागे, टाईम्स ऑफ इंडिया लेन, मुंबई ४००००१ .
जवळचे रेल्वे स्थानक - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (सी.एस.टी.एम), मध्य रेल्वे
एफआरआरओ टेलिफोन क्रं. : ०२२ -२२६२११६९ , फॅक्स क्रं.
०२२ -२२६२०७२१
नोंदणी आणि व्हिसा सेवांसाठी चौकशीकरिता टेलिफोन क्रमांक ०२२ -२२६२०४४६ वर संपर्क साधू शकता.
पीआयओ / ओसीआय साठीची चौकशीकरिता टेलिफोन क्रमांक ०२२ -२२६२११६७ वर संपर्क साधू शकता.
कामाचे तास : एफआरआरओ मुंबई कार्यालय नोंदणी आणि विस्तार पत्रांच्या प्रक्रियेसाठी सोमवार ते शुक्रवार सकाळी९ .३० वा. ते रात्री १ .०० वा. पर्यंत आणि महिन्याच्या पहिला, तिसरा आणि पाचवा शनिवारी १२.०० वा. पर्यंत खुले असते.
स्थानिक सशस्त्र पोलीस दल
About Us
अपर पोलीस आयुक्त हे सशस्त्र पोलीस दलाचे प्रभारी आहेत. अपर पोलीस आयुक्त, सशस्त्र पोलीस यांचे कार्यालय नायगाव, दादर (पूर्व), मुंबई -४०००१४ येथे स्थित आहे.
मुंबई पोलीसचे सशस्त्र पोलीस दलाचे एकूण ५ सशस्त्र पोलीस मुख्यालये खाली नमूद केलेल्या खालील ठिकाणी स्थित आहेत
सशस्त्र पोलीस मुख्यालये |
पत्ता |
सशस्त्र पोलीस - १ / दं.नि.प. | नायगांव, दादर (पूर्व), मुंबई ४०००१४ |
सशस्त्र पोलीस - 2 | ताडदेव, मुंबई सेन्ट्रल, मुंबई ४०००१८ |
सशस्त्र पोलीस - ३ | वरळी पोलीस कॅम्प, वरळी, मुंबई ४०००३० |
सशस्त्र पोलीस – ४ | मरोळ पोलीस कॅम्प, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०००५९ |
सशस्त्र पोलीस - ५ | कोळे कल्याण, कालिना, मुंबई ४०००५५ |
प्रत्येक सशस्त्र पोलीस मुख्यालयाचे नेतृत्व पोलीस उप आयुक्त करतात. पोलीस उप आयुक्तांचे कार्यालय त्यांच्या संबंधित मुख्यालयात आहेत.
प्रशिक्षणे |
कालावधी |
परिविक्षाधीन पोलीस अधिकारी प्रशिक्षण | एक महिना |
रिफ्रेशर प्रशिक्षण | पंधरा दिवस |
रिव्हॉल्वर प्रशिक्षण | एक आठवडा |
रिव्हीजन प्रशिक्षण | तीन दिवस |
ऑल वेपन प्रशिक्षण | पंधरा दिवस |
पोलीस शिपाई भरती प्रशिक्षणांसह गॅस शील्ड, ग्रेनेड प्रशिक्षण देखील आयोजित केले जाते.
आधुनिक नियंत्रण कक्ष
About Us
• २९ मार्च १७८० रोजी पोलीस लेफ्टनंट कार्यालय विसर्जित करून उपायुक्त, मुंबई यांचे कार्यालयची निर्मिती करण्यात आली.
• त्यानंतर १७९३ मध्ये पोलीस उपायुक्त हे पद रद्द करून पोलीस अधीक्षक हे पद निर्माण केले गेले. श्री. सायमन हॉलिडे हे पहिले पोलीस अधीक्षक होते आणि ते १८०८ पर्यंत पदावर होते.
• १३ ऑक्टोबर, १८५६ रोजी श्री. डब्ल्यू. क्रॉफर्ड हे मुंबई शहर आणि मुंबई बेटाकरिता प्रथम पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त झाले.
• १८९६ मध्ये आयुक्त कार्यालय हे अंग्लो-गॉथिक पुनरुत्थान इमारतीत हलविण्यात आहे, जे अद्यापपर्यंत वास्तव्यास आहे. मुंबई पोलिस मुख्यालयाची इमारत हि वारसावास्तू म्हणून संरक्षित आहे.
• स्वातंत्र्यानंतर, मुंबई पोलिस दलात अनेक बदल झाले. १५ ऑगस्ट १९५७ रोजी श्री. एस.एस. भरूचा हे मुंबई पोलिसांचे पहिले भारतीय प्रमुख बनले.
• १९६९ चे स्वातंत्र्यदिनी मुंबई पोलीस नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला.
• उपलब्ध नोंदीनुसार, २६ जानेवारी १९५७ रोजी महाराष्ट्रचे मुख्यमंत्री श्री वाय.बी. चव्हाण यांनी अधिकृतपणे नवीन मुंबई शहर पोलीस नियंत्रण कक्ष उघडण्यात आले.
• सन २००५ मध्ये, मुख्य नियंत्रण कक्ष हा संगणकीकृत प्रणालीसह आधुनिकीकरण करण्यात आला आणि आयएसओ ९००१: २००० हे मानांकन प्रमाणकंन २५/१०/२००५ रोजी प्राप्त झाले.
• सन २०१७ मध्ये, मुंबई शहर पर्यवेक्षण प्रकल्पाच्या अंतर्गत मुख्य नियंत्रण ककक्षाचे पुन्हा आधुनिकीकरण करण्यात आले आणि मुंबई शहरातील १५०० पेक्षा अधिक स्थानांवर ४७०० पेक्षा अधिक सर्वात अत्याधुनिक कॅमेरे स्थापित करण्यात आले आहेत.
डायल १०० ( नागरिकांकरिता )
डायल १०३ ( महिला व मुले )
डायल १०९० ( वरिष्ठ नागरिक )
दूरभाष - २२६३३३३३ ( दक्ष नागरिक )
मुंबई शहर सेवा प्रकल्प (सीसीटीव्ही)
७७३८१३३१३३ आणि ७७३८१४४१४४ (एस.एम.एस. सेवा )
संरक्षण व सुरक्षा
About Us
संरक्षण व सुरक्षा विभाग यापुर्वी अप्पर पोलीस आयुक्त, विशेष शाखा, गु.अ.वि., मुंबई यांचे अधिपत्याखाली कार्यरत होता. विद्यमान स्वतंत्र संरक्षण आणि सुरक्षा शाखा १९९९ मध्ये अस्तित्वात आले. महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक Home Dept. No. IPS-1798/C.No.433/ Pole No-1, Dated 19/03/1999 अन्वये पोलीस उप आयुक्त (सुरक्षा), विशेष शाखा-१, गु.अ.वि., या पदाची सध्याचे अप्पर पोलीस आयुक्त, संरक्षण व सुरक्षा या पदावर श्रेणीवाढ करून सध्याचा संरक्षण व सुरक्षा विभाग सन १९९९ साली कार्यरत झाला.
संरक्षण व सुरक्षा विभाग प्रशिक्षित कर्मचारी संगठण असून मुंबईस्थित व मुंबई बाहेरील महत्वाच्या व अतिमहत्वाच्या विविध स्तरातील (खाजगी/राजकीय/सामाजिक) संरक्षित व्यक्तींचे (वर्गीकृत/अवर्गीकृत) संरक्षण तसेच महत्वाची/संवेदनशील मर्मस्थळे व आस्थापनांच्या सुरक्षा व्यवस्थेचे काम पहिले जाते.
अप्पर पोलीस आयुक्त, (संरक्षण व सुरक्षा) यांचे अखत्यारीतील पोलीस उप आयुक्त (संरक्षण), पोलीस उप आयुक्त (सुरक्षा), पोलीस उप आयुक्त(मंत्रालय सुरक्षा) या विभागांचे कामकाज चालते. याव्यतिरिक्त पोलीस उप आयुक्त (जलद प्रतिसाद पथक) यांचे अभियान व प्रशिक्षण व सागरी सुरक्षा विभागाच्या कामकाजावर देखरेख अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे.
संरक्षण शाखांतंर्गत संरक्षण शाखा १,२ व ४ यांचेकडुन अवर्गीकृत संरक्षित व्यक्तींना लगतचे संरक्षण पुरविले जाते. याव्यतिरिक्त मा. राजपाल यांचे निवासस्थान (राजभवन), मा. मुख्यमंत्री यांचे निवासस्थान (वर्षा बंगला) तसेच मातोश्री बंगला या ठिकाणांची सुरक्षा व्यवस्था पहिली जाते.
मुंबईस्थित महत्वाची मर्मस्थळे, आस्थापना तसेच अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या मुंबई भेटी दरम्यानच्या ठिकाणांची संरक्षण शाखांतर्गत तांत्रिक शाखा, बी. डी. डी. एस. व श्वानपथक यांचेकडुन घातपात विरोधी तपासणी संयुक्तपणे करण्यात येत असते.
सुरक्षा शाखेकडुन अभिलेखावरील महत्वाची वर्गीकृत/अवर्गीकृत मर्मस्थळे, आस्थापना, स्थळे, मॉल्स/मल्टिप्लेक्स व परदेशी वकालती यांचा सुरक्षा आढावा घेतला जातो. मुंबईस्थित परदेशी वकिलातींचे महावाणिज्य दूत यांना अंगसंरक्षक तसेच आस्थापनांच्या ठिकाणी नेमले जातात.
मंत्रालय मुख्य इमारत, जोड इमारत, नवीन प्रशासकीय इमारत व सह्याद्री गेस्ट हाऊस या आस्थापनांच्या सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी पोलीस उप आयुक्त (मंत्रालय सुरक्षा) यांचेकडुन पहिली जाते.
मोटार परिवहन विभाग
About Us
संक्षिप्त इतिहास
१९ डिसेंबर १९३२ रोजी सैन्यातून सेवानिवृत्त झालेल्या चालकांनी चालवलेल्या काही जुन्या वाहनांसह मुंबईत मोटर परिवहन विभाग सुरु करण्यात आला. सन १९४७ नंतर वाहनांची संख्या वाढली आणि १९७२ मध्ये वाहनांची संख्या ४७२ होती.
नागरी सेवा दिनादिवशी 'उल्लेखनीय बचत आणि उल्लेखनीय कामगिरीकरीता' आम्हाला महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री यांचेकडून सन २०१७ साठीचा 'नागरी सेवा पुरस्कार' मिळाला आहे.
• विभाग प्रमुख अधिकाऱ्याची भूमिका आणि जबाबदारी -
अपर पोलीस आयुक्त (तांत्रिक) हे सध्या विभागाचे मुख्य अधिकारी असून त्यांच्या अंतर्गत ०२ पोलीस उपायुक्त कार्यरत आहेत. त्यांची भूमिका -
१. वाहने आणि नौकाविषयी पोलिस आयुक्तांना तांत्रिक सल्लागार म्हणून कार्य करणे.
२. पोलीस उपायुक्त यांचे कामाचे पर्यवेक्षण करणे.
३. नवीन वाहने खरेदी करणे आणि जुन्या वाहनांने मोडीत काढणे.
४. वाहनाचे किरकोळ भाग, इंधन आणि स्नेहक ( वंगण ) पदार्थ खरेदी करणे.
५. पोलीस ठाणे आणि इतर शाखा / विभागांना बंदोबस्त आणि गस्तकामी वाहने पुरविणे.
६. मुंबईतील अति महत्त्वाचे व्यक्तीचे भेटीदरम्यान पायलट, एस्कॉर्ट आणि इतर वाहने पुरविणे.
७. सर्व वाहने सुस्थितीत ठेवणे.
८. स्पीड बोट्स सुस्थितीत ठेवणे.
९. चालक, तंत्रज्ञ, लॉन्च आणि तांत्रिक कर्मचारी यांची हजेरी आणि कल्याण याकडे लक्ष देणे.
• उल्लेखनीय कामगिरी
खालील गोष्टीची पूर्तता झाल्याने लक्षणीय बचत झाली आहे -
१. फ्युएल ऍव्हरेज मॉनिटरींग ड्राइव्ह, इंधन हाताळणीचे प्रभावी मार्गाचे प्रशिक्षण आणि इओसीएल / एचपीसीएल सवलत प्राप्त करून.
२. अधिकृत पुरवठादाराकडून ई-निविदाद्वारे तेल आणि उत्पादकाकडून थेट एक्सडी-९० बोट तेल खरेदी करणे.
३. बॉयोमीट्रिक उपस्थिति प्रणाली आणि सीसीटीव्ही नियंत्रण रूम स्थापित करून कामाचे अधिक तास कमी करणे.
४. प्रत्येक पोलीस ठाणेस अधिकारीमार्फत भेट देऊन प्रतिबंधात्मक तपासणी करणे.
५. वाहन निर्माण कंपन्यांसह सतत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे.
६. माननीय पोलीस महासंचालकद्वारे निविदा काढण्याऐवजी, ३५ कैदी वाहक वाहनांची बांधणी मोटर परिवहन विभागात करून प्रत्येक वाहनामागे सुमारे रुपये २ लाखाची बचत केली.
७. मोटर परिवहन विभागात ३५ मार्क्समन वाहनांची पुनर्रचना करून वाहनांचे आयुष्य 03 वर्षांनी वाढविले.
• मोटार परिवहन विभागाचे आधुनिकीकरण –
१. सुसज्ज प्रशिक्षण, कॉन्फरन्स हॉल.
२. मानवी परिश्रम आणि कामाचे तास वाचविण्याकरिता हवेचा दाबावर चालणारी साधने ( न्यूमॅटिक टूल्स ) आणि दोन उभारणी केंद्र उभारली.
३. बॉयोमीट्रिक उपस्थिति प्रणाली आणि सीसीटीव्ही नियंत्रण रूम.
पोलीस शल्यचिकित्सक
About Us
पोलीस शल्यविशारद हे मुंबईतील सर्व पोलीस रुग्णालये, पोलीस दवाखाने आणि फिरते पोलीस रुग्णालय यांचे प्रभारी अधिकारी आहेत. ०५ वैदयकिय अधिकारी पोलीस शल्यविशारद यांच्या पर्यावेक्षणात कार्यरत आहेत.
नागपाडा पोलीस रुग्णालय हे सन १८६७ पासून कार्यरत असून सध्याची इमारत सन १९४० मध्ये बांधण्यात आली. नागपाडा पोलीस रुग्णालय येथे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना वैदयकिय सुविधा पुरविण्यात येतात.
नागपाडा पोलीस रुग्णालय येथे ११४ बेड आणि ०५ वैद्यकीय प्रयोगशाळा असुन येथे १३३ कर्मचारी कार्यरत आहेत. नागपाडा पोलीस रुग्णालय येथे ईसीजी प्रयोगशाळा, दंत चिकित्सालय, नेत्ररोग विशेषज्ञ, फिजिओथेरेपी, ऑपरेशन थियेटर, एक्सरे - १. ईसीओ, अल्ट्रासाऊंड, सोनोग्राफी, स्ट्रेस टेस्ट, ओरिमेट्रिक क्लिनिक, श्रवणयंत्र इ. सुविधा उपलब्ध आहेत. तसेच नागपाडा पोलीस रुग्णालय येथे ०१ औषधांचे दुकान व ०१ वैद्यकीय दवाखाना आहे.
विविध वैद्यकीय विद्याशाखेतील तज्ञ ३० मानद डॉक्टर येथे त्यांची सेवा देतात. त्यांच्याकरिता ०४ स्वतंत्र मानद चिकित्सा (खोल्या) उपलब्ध आहेत.
तसेच नायगाव उप पोलीस रुग्णालय येथे ०५ वैद्यकीय अधिकारी आणि ३३ रुग्णालय कर्मचारी कार्यरत असून एकूण ४४ बेड आहेत.
पत्ता - नागपाडा पोलीस रुग्णालय,
सोफिया झुबेर मार्ग,
नागपाडा, मुंबई - ४००००८.
२ पोलीस रुग्णालये |
|||
1 | नागपाडा पोलीस रूग्णालय | 2 | नायगांव उप पोलीस रुग्णालय |
१२ पोलीस दवाखाने |
|||
१ | पोलीस आयुक्त कार्यालय आवार दवाखाना | ७ | सांताक्रुझ पोलीस दवाखाना |
२ | ताडदेव पोलीस दवाखाना | ८ | अंधेरी पोलीस दवाखाना |
३ | दा. भ. मार्ग पोलीस दवाखाना | ९ | मरोळ पोलीस दवाखाना |
४ | वरळी पोलीस दवाखाना | १० | कांदिवली पोलीस दवाखाना |
५ | दादर पोलीस दवाखाना | ११ | नेहरुनगर पोलीस दवाखाना |
६ | माहिम पोलीस दवाखाना | १२ | पंतनगर पोलीस दवाखाना |
बृहन्मुंबई पोलीस वाद्यवृंद पथक
About Us
जगातील संपुर्ण ब्रिटिश साम्राज्यामध्ये सन १९३५ हे वर्ष ′रजत जयंती वर्ष′ म्हणुन साजरे करण्यात आले. भारतामध्येही या निमित्ताने ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या रजत जयंती वर्षाच्या निमित्ताने नायगांव पोलीस कवायत मैदानावर ३ डिसेंबर १९३५ रोजी एका शानदार संचालनाचे आयोजन करून नेहमीच्या प्रथेप्रमाणे सर्व प्रतिष्ठितांना आणि जनतेला निमंत्रित करण्यात आले होते. गव्हर्नर लॉर्ड ब्रेबॉर्न यांनी मानवंदना स्वीकारली. मुंबई पोलीसांच्या उत्कृष्ठ संचालनाने सर्वांची मने जिंकली असली तरी एक बाब मात्र प्रतिष्ठितांना खटकत होती, ती म्हणजे या संचालनासाठी मुंबई पोलीसांचे स्वतःचे वाद्यवृंद अस्तित्वात नव्हते.
नायगांव पोलीस मुख्यालयाची शास्त्रोक्त पद्धतीने म्हणजेच अभियांत्रिकी दृष्टीने केलेली रचना आदर्शवत समजले जाणारे मैदान, आकर्षक असणारे पोलीस संचालन इत्यादी सर्व बाबी उत्कृष्ठ असल्या तरी, जोपर्यंत या पोलीस दलाकडे वाद्यवृंद (बँड पथक) उपलब्ध होत नाही, तोपर्यंत परेडचे परिपुर्णता झाल्याचे समाधान नाही; असा एक विचार तेथील उपस्थित प्रतिष्ठित मान्यवरांकडे चर्चेला आला. सरकारच्या काटकसरी आर्थिक धोरणामुळे पोलीस वाद्यवृंदावर एव्हढा खर्च करणे, सध्यातरी शक्य नव्हते. या विचारातून उत्स्फूर्तपणे प्रतिष्ठित दानशूर व्यक्ती पुढे सरसावल्या आणि पुढील डिसेंबर मध्ये होणाऱ्या वार्षिक पोलीस कवायतीच्या वेळी पोलीसांना वाद्यवृंद साहित्य उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला गेला. प्रतिष्ठित आणि व्यावसायिक दानशुरांप्रमाणेच सर्व सामान्य नागरिकांनी देखील त्यांच्या ऐपतीप्रमाणे पै-पैसा गोळा करून एक बऱ्यापैकी निधी जमा झाला. त्यातून ब्रास बँडचे वाद्य व साहित्य खरेदी करण्यात आले. अशा प्रकारे १९३६ च्या सुरवातीच्या मुंबई शहर पोलीस दलाला प्रथमच ब्रास बॅण्ड पथक उपलब्ध झाला.
भारताचे नवनिर्वाचित व्हाइसरॉय लॉर्ड लिनलियागो यांच्या हिंदुस्थानातील मुंबई येथील प्रथमच आगमनाच्या निमित्ताने त्यांच्या स्वागताप्रीत्यर्थ १७ एप्रिल १९३६ रोजी गेट वे ऑफ इंडिया येथे एक पारंपरिक समारंभाचे एक विशेष आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने झालेल्या शानदार संचालनामध्येमिलिटरी वाद्यवृंदासोबत मुंबई पोलीसांच्या वाद्यवृदाचे शानदारपणे पदार्पण करण्यात आले. या मुंबई पोलीस वाद्यवृंदाचे प्रमुख बॅण्डमास्टर सी.आर.गार्डनर यांनी मिळालेल्या संधीचे सोने करून आपल्या पदार्पणातच उपस्थितांची मने जिंकली.
अखेर तो दिवस उगवला. १९३६ च्या डिसेंबरमध्ये विशेष पोलीस संचालनात पोलीसांच्या वाद्यवृंदाने स्वतंत्रपणे वाद्य वाजवावीत, असे प्रतिष्ठित मंडळीने ठरविले होते. लॉर्ड ब्रेबॉर्न या हरहुन्नरी आणि खिलाडू वृत्तीच्या गव्हर्नर साहेबांनी अखेर मान्यता दिल्यानंतर १८ डिसेंबर १९३६ रोजी नायगांव मैदानावर पार पडलेल्या विशेष वार्षिक पोलीस संचालनामध्ये पोलीस वाद्यवृंदाने प्रथमच स्वतंत्रपणे वाद्य वाजवुन आपले वाद्य कौशल्य मुंबईकर जनतेसमोर सादर करून शाबासकीची थाप पाठीवर मारून घेतली. याच वेळी झालेल्या विशेष समारंभामध्ये गव्हर्नरलॉर्ड ब्रेबॉर्न यांच्या हस्ते वाद्यवृन्दासाठी देणगी देणाऱ्या दानशूर दातृत्वांचा खास सत्कार करण्यात आला. त्यांनी ब्रॅन्ड प्रमुख गार्डनर आणि त्यांच्या सहकाऱ्याचेही तोंडभरून कौतुक केले. तत्कालिन जनताभिमुख पोलीस कमिशनर बॅरिस्टर डब्ल्यू.आर.जी.स्मिथ यांच्या विशेष प्रयत्नामुळेच ही पोलीस वाद्यवृंद पोलीस निर्मिती झाली. त्यामुळे त्यांनाही सर्वांनी धन्यवाद दिली. अशा प्रकारे बृहन्मुंबई पोलीस दलाला वाद्यवृंद पथक उपलब्ध झाले. म्हणुन १८ डिसेंबर हा दिवस मुंबई पोलीस दलामध्ये वाद्यवृंद दिवस म्हणुन साजरा केला जातो.
अ. क्र. | बॅण्डमास्टरचे नाव | वर्ष |
1 | सी.आर.गार्डनर | १९३६-१९४८ |
2 | कॅर्वल्लो | १९४९-१९५३ |
3 | ब्रिटे | १९५४-१९५७ |
4 | फ्रँको | १९५८-१९६७ |
5 | विजय शिंदे | १९६८-१९७४ |
6 | मेहबूब खान | १९७५-१९८१ |
7 | सामुईल मोहिते | १९८२-१९८४ |
8 | जेरोमी रॉड्रीगुएस | १९८५-२००२ |
9 | रफिक रझ्झाक शेख | २००३-२००५ |
10 | सौदन भवानी सिंग | २००६-२०१८ |
11 | दत्तात्रय लक्ष्मण नाईकधुरे | २०१८ |