×

ध्वनिक्षेपक परवानगी


अर्जदाराचे तपशील





संस्थेचा तपशील






   Max 5 MB
Select Files to Upload

आयोजकांचे तपशील





कार्यक्रमाचा तपशील










   Max 5 MB
Select Files to Upload

ध्वनिक्षेपक कंत्राटदार तपशील






   Max 5 MB
Select Files to Upload

    अटी व शर्ती

  1. १. ध्वनिक्षेपक बॉक्स टाईप पद्धतीचा असावा व त्याचा आकार जास्तीस जास्त १५ इंच X १० इंच इतका असावा.
  2. २. ध्वनिक्षेपक जास्तीस जास्त ३.५ वॅट क्षमतेचा असावा.
  3. ३. ध्वनीप्रदूषण (नियमन आणि नियंत्रण) नियम-२००० अन्वये आवाजाची पातळी, खाली नमूद केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त नसावी. आवाजाच्या बाबतीतील वातावरणीय हवा गुणवत्ता मानके ;
    आवाजाच्या बाबतीतील वातावरणीय हवा गुणवत्ता मानके:-
    क्षेत्र संकेतांक क्षेत्र / झोन प्रकार मर्यादा डी बी ( ए ) एलईक्यू मध्ये *
    दिवसा- ०६.०० ते २२.०० वा.प. रात्री- २२.०० ते ०६.०० वा.प.
    (अ) औद्योगिक क्षेत्र ७५ ७०
    (ब) व्यापारी क्षेत्र ६५ ५५
    (क) निवासी क्षेत्र ५५ ४५
    (ड) शांतता क्षेत्र ५० ४०
    टिप:— (१)दिवसाची वेळ म्हणजे सकाळी 6.00 ते रात्री 10.00 वा.जे पर्यंत. (२)रात्रीची वेळ म्हणजे रात्री 10.00 ते सकाळी 6.00 वा.जे पर्यंत. (३)शांतता क्षेत्र हा असा परिसर आहे जेथे रुग्णालये, शैक्षणिक संस्था, न्यायालये, धार्मिक स्थळे किंवा अश्या कोणत्याही क्षेत्राभोवतीचा १०० मीटरपेक्षा कमी नसतो ज्यास सक्षम प्राधिकरणाद्वारे घोषित केले जाते. (४)सक्षम प्राधिकरणाने क्षेत्राच्या मिश्रित श्रेण्या वर नमूद केलेल्या चार प्रकारांपैकी एक म्हणून घोषित केल्या जाऊ शकतात.
    dB(A) Leq- आवाजातील पातळीच्या सरासरी वेळेचा अर्थ दर्शवितो.
    मानवी श्रवणशक्तीशी संबंधित असलेल्या स्केल (A)वरdB “डेसिबल” एक असे युनिट आहे, ज्यामध्ये आवाज मोजला जातो.
    dB(A) Leq मधील “(A)” आवाज मोजण्यासाठी वारंवारता वजन दर्शवते आणि मानवी कानातील वारंवारता प्रतिसाद वैशिष्ट्यांशी संबंधित आहे.
    Leq- हे एकाविशिष्ट कालावधीत आवाज पातळीवरील उर्जा आहे.
  4. ४. ध्वनीक्षेपकाचे वापरास प्रतिबंध - रात्री
  5. ५. अर्जामध्ये नमूद केलेली ध्वनिक्षेपकाची जागा अधिकृत पोलीस प्राधिकरणाच्या पूर्व परवानगी शिवाय बदलू नये.
  6. ६. ध्वनिक्षेपक परवाना शुल्क खालील प्रमाणे आहे.
    परवान्यासाठी नवीन अर्ज रु. १०/-
    ७ दिवसांसाठी परवाना रु. २०० /-
    ७ दिवसांपेक्षा जास्त परंतु ३० दिवसांपेक्षा कमी दिवसांसाठी नूतनीकरण रु. २० /- प्रति दिवस
  7. ७. परवान्यातील शर्ती व अटींचा भंग केल्यास ध्वनिक्षेपक ठेकेदारावर कलम १३१, मुंबई पोलीस अधिनियम १९५१ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
  8. ८. पर्यावरण ( संरक्षण ) कायदा १९८६ च्या कलम १५ अन्वये, या कायद्यातील कोणत्याही तरतुदीचा आणि त्या कायद्यास अनुसरून जारी केलेल्या आदेशाचा, नियमांचा भंग केल्यास त्यासाठी ५ वर्ष इतक्या मुदतीच्या तुरुंगवासाची आणि रु. १,००,०००/- ( रुपये एक लाख ) इतक्या दंडाची शिक्षा होईल.
  9. ९. मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी जनहित याचिका क्र. १७३/२०१० मध्ये ध्वनी प्रदुषणासंदर्भात दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन झाले पाहिजे मा. न्यायालयाच्या सूचनांचे पालन न झाल्यास आयोजकावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
    [ परिशिष्ट - १ ]
  10. १०. दिलेला परवाना रद्द करण्याचा पोलिसांना अधिकार आहे.

मला वरिल अटींच्या व शर्तींच्या अधीन राहून ध्वनिक्षेपक वापरण्याची परवानगी देण्यात येईल याची मला जाणीव आहे.

GRAS प्रणालीवर रक्कमेची भरणा करण्याची कार्यपद्धती:- १) Google ( सर्च इंजिन ) मध्ये ऍड्रेस बारवर पुढील URL लिहा https://gras.mahakosh.gov.in/echallan २) “नोंदणी न करता रक्कम भरण्यासाठी” खालील दिलेली लिंक पहा. https://gras.mahakosh.gov.in/echallan/Common/gras_manuals/Unregistered_Users.pdf ३) GRAS वर रक्कम भरणा करताना लागणारी आवश्यक माहिती खालीलप्रमाणे ;

1. DEPARTMENT NAME - COMMISSIONER OF POLICE, MUMBAI
2. PAYMENT TYPE - RECEIPTS OF STATE HEADQUATERS POLICE
3. SCHEME NAME - FEES RECOVERABLE FOR LICENCES GRANTED UNDER POLICE ACT
4. SCHEME NO. - 0055015501