उत्कृष्ट कामगिरी
०८-ऑक्टोबर-२०२५
मा. वपोनि साो, नेहरूनगर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पथक व डिटेक्शन पथकाने केलेली चांगली कामगीरी
सोशल मिडीया
०६-ऑक्टोबर-२०२५
सायबर पथकाने केलेली चांगली कामगीरी
नेहरू नगर पोलिस ठाणे येथे कुर्ला पूर्व परिसरात गहाळ झालेले मोबाईल यांचे फिर्यादी यांना आज रोजी नेहरू नगर पोलिस स्टेशन ठाणे येथे बोलावून मा. स. पो. आ. मृत्युंजय हिरेमठ तसेच मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पोपळघट यांचा हस्ते फिर्यादी यांचे मोबाईल परत केले. *पो.उप.नि सुर्यगंध, म. पो. शि. 080940/तारळकर, पो. शि. 140113/सुर्यवंशी यांनी CEIR पोर्टलद्वारे तांत्रिक तपास करून सदर मोबाईलचा शोध घेतला आहे.
२७-सप्टेंबर-२०२५
सायबर पथकाने केलेली चांगली कामगीरी
नेहरू नगर पोलिस ठाणे मोबाईल मिसिंग क्रमांक - 162/25 तक्रारदार नामे श्री. शेखर वनवे यांनी नेहरू नगर पोलीस ठाणे येथे समक्ष येवून त्यांचा ओप्पो कंपनी मोबाईल हा कुर्ला स्टेशन परिसरात गहाळ झाल्याबाबत तक्रार केली होती. पो.उप.नि सुर्यगंध, म. पो. शि. 080940/तारळकर, पो. शि. 140113/सुर्यवंशी यांनी CEIR पोर्टलद्वारे तांत्रिक तपास करून सदर मोबाईलचा शोध घेतला असता मोबाईलचे लोकेशन अजमेर राजस्थान, येथे असल्याचे समजले. सदर मोबाईल संबंधित इसम यांना तात्काळ नेहरू नगर पोलीस स्टेशन येथे कुरियर द्वारे जमा करण्यास सांगितले. त्यानुसार सदरचा मोबाईल नेहरू नगर पोलीस ठाणे येथे जमा करण्यात आला. आज दिनांक 27/09/2025 रोजी तक्रारदार यांना बोलावून सदरचा मोबाईल दिवस पाळी परिवेक्षक सहाय्य्क पोलीस निरीक्षक गजभारे यांच्या हस्ते तक्रारदार यांना देण्यात आला.
२४-सप्टेंबर-२०२५
सायबर पथकाने केलेली चांगली कामगीरी
नेहरू नगर पोलिस ठाणे मोबाईल मिसिंग क्रमांक - 99/25 तक्रारदार नामे श्री. तनिष चव्हाण यांनी नेहरू नगर पोलीस ठाणे येथे समक्ष येवून त्यांचा पोको कंपनी मोबाईल हा कुर्ला स्टेशन परिसरात गहाळ झाल्याबाबत तक्रार केली होती. पो.उप.नि सुर्यगंध, म. पो. शि. 080940/तारळकर, पो. शि. 140113/सुर्यवंशी यांनी CEIR पोर्टलद्वारे तांत्रिक तपास करून सदर मोबाईलचा शोध घेतला असता मोबाईलचे लोकेशन चंदीगड , येथे असल्याचे समजले. सदर मोबाईल संबंधित इसम यांना तात्काळ नेहरू नगर पोलीस स्टेशन येथे कुरियर द्वारे जमा करण्यास सांगितले. त्यानुसार सदरचा मोबाईल नेहरू नगर पोलीस ठाणे येथे जमा करण्यात आला. आज दिनांक 24/09/2025 रोजी तक्रारदार यांना बोलावून सदरचा मोबाईल दिवस पाळी परिवेक्षक पोलीस निरीक्षक पवार त्यांच्या यांच्या हस्ते तक्रारदार यांना देण्यात आला.
२३-सप्टेंबर-२०२५
सायबर पथकाने केलेली चांगली कामगीरी
नेहरू नगर पोलिस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक 81/24 तक्रारदार नामे श्री. कल्पेश माने यांनी नेहरू नगर पोलीस ठाणे येथे समक्ष येवून त्यांचा रियलमी मोबाईल हा कुर्ला स्टेशन परिसरात गहाळ झाल्याबाबत तक्रार केली होती. पो.उप.नि सुर्यगंध, म. पो. शि. 080940/तारळकर, पो. शि. 140113/सुर्यवंशी यांनी CEIR पोर्टलद्वारे तांत्रिक तपास करून सदर मोबाईलचा शोध घेतला असता मोबाईलचे लोकेशन मुंब्रा, ठाणे येथे असल्याचे समजले. सदर मोबाईल संबंधित इसम यांना तात्काळ नेहरू नगर पोलीस स्टेशन येथे जमा करण्यास सांगितले. त्यानुसार सदरचा मोबाईल नेहरू नगर पोलीस ठाणे येथे जमा करण्यात आला. आज दिनांक 23/09/2025 रोजी तक्रारदार यांना बोलावून सदरचा मोबाईल त्यांच्या ताब्यात देण्यात आला.
१६-सप्टेंबर-२०२५
चांगली कामगीरी निष्कासन कारवाई
नेहरूनगर पोलीस स्टेशन हद्दी मध्ये वसलेले व बहुसंख्य मुस्लिम वस्ती असलेले जागृती नगर येथे " कुर्ला कदम एस आर ए सहकारी गृहनिर्माण संस्था असून तिचे पुनर्वसन प्रकल्प चे काम एस आर ए मार्फत सुरू होत आहे. सदर ठिकाणी गेली 50 वर्षापासून अन्वरुल कुराण ही मदरसा अस्तित्वात आहे....सदर मदरसा सोबत गेली पन्नास वर्षापासून मुस्लिम धर्मीयांच्या धार्मिक भावना जुळलेल्या होत्या. एस आर ए मार्फत राबविले जाणारे प्रकल्पांमध्ये सदर मदरसा बाधित होत होती. सोसायटीची कमिटी मदरसाची कमिटी व स्थानिक रहिवासी यांचे मध्ये आपसामध्ये मदरसा निष्कासन करने वरून खूप मोठा वाद होता.. सदर प्रकल्पाची बांधकाम सुरू करण्यापूर्वी मदरसा निष्कासन करणे गरजेचे असल्याने विकासक प्रमोद पिसाळ यांनी दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी सदर मदरसाचे निष्कासन करने करिता, माननीय उपजिल्हाधिकारी (विशेष कक्ष) पूर्व उपनगरे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बृहन्मुंबई यांचे पत्र देऊन मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त मागणी केली होती... परंतु आगामी काळात साजरा होणारा नवरात्र उत्सव व आमच्या मार्फतीने काढलेले गोपनीय वृत्त आधारे विकासाचे प्रतिनिधी आसिफ मन्सूर खान सेक्रेटरी कुर्ला कदम हाउसिंग सोसायटी व श्री मोहम्मद हनीफ खान (सदर) अन्वरुल कुराण मदरसा .. यांचे सह जागृती नगर येथील बहुसंख्य मुस्लिम धर्मियांची तसेच पदाधिकाऱ्यांची पोलीस ठाणे एकत्रित बैठक आयोजित करण्यात आली होती.. त्यामध्ये त्यांच्यातील आपसातील मतभेद तसेच निर्माण होणारी कायदा व सुव्यवस्था व त्याचे दुष्परिणाम याबाबत त्यांना पोलीस प्रशासनामार्फत ठाम मत मांडणी करण्यात आली.... त्यामुळे मदरसाचे सदर व विकासाचे पदाधिकारी यांचे मध्ये आपसामध्ये एकमत होऊन , कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता व एकही अधिकारी अथवा अंमलदाराची बंदोबस्त कामी नेमणूक न करता हि सदर मदरसा कमिटी मेंबर्स यांनी आज रोजी स्वतःहून संपूर्ण निष्कासित करून भोई सपाट केली आहे.
२१-ऑगस्ट-२०२५
चांगली कामगीरी
दिनांक 21/08/2025 रोजी 20.30 रोजी तक्रारदार नामे श्रीमती :- मनीषा सुशील चोरगे वय 57 वर्ष राठी रूम नंबर 102 बिल्डिंग नंबर 85 नेहरूनगर कुर्ला पूर्व मुंबई 24 यांनी पोलीस ठाणे येथे येऊन कळवले की प्रवासादरम्यान त्यांची पर्स व त्या मध्ये मोबाईल,किंमत 20000आधारकार्ड, रोख रक्कम 2500 व इतर वस्तू असे रिक्षात विसरले बाबत तक्रार दिली. तेव्हा नेहरू नगर पोलीस ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, यांचे मार्गदर्शनाखाली, रात्रपाळी पर्यवेक्षक पोलिस निरीक्षक, पवार व ठाणे अंमलदार पो. उप. नि. पल्लवी पाटील यांच्या सोबत नेहरू नगर गुन्हे प्रकटी करण पथक चे अंमलदार 1)091694/कोलते,140679/पाचपुते,141739/ ताजवे यांनी तत्पर जाऊन त्या ठिकाणचे cctv तपासनी करून सदर ऍटो रिक्षा ची माहिती मिळवून 1 तासाच्या आत ती पर्स व त्या मधील त्यांचे सर्व साहित्य त्यांच्या ताब्यात दिले
डिटेक्शन पथक व मिसींग पथक यांनी केलेली चांगली कामगीरी
डिटेक्शन पथक व मिसींग पथक यांनी केलेली चांगली कामगीरी
२०-ऑगस्ट-२०२५
ईद ए मिलाद मिरवणूक काढणारे आयोजक मोहल्ला कमीटी सदस्य यांची सनाच्या अनुषंगाने पोलीस ठाणेस बैठक
दिनांक 20/08/2025 रोजी ईद ए मिलाद मिरवणूक काढणारे आयोजक मोहल्ला कमीटी सदस्य यांची सनाच्या अनुषंगाने पोलीस ठाणेस बैठक घेण्यात येत आहे. सरदवेळी वपोन िसाो, पोनि जनसंपर्क , पोनि (का. व सु.) तसे इतर अधिकररी अंमदादर हजर होते. तसेच 20 ते 25 गणपती मंडळांचे पदाधिकरी हजर होते.
१३-सप्टेंबर-२०२५
पोलीस ठाणे येथे पोलीस ठाणे हद्दीतील सर्व नवरात्रोत्सव मंडळे, मोहल्ला कमीटी, महिला दक्षता समिती, डी जे चालक मालक, यांची पोलीस ठाणे आवारात बैठक घेण्यात आली.
दिनांक 13.09.2025 रोजी नेहरूनगर पोलीस ठाणे येथे पोलीस ठाणे हद्दीतील सर्व नवरात्रोत्सव मंडळे, मोहल्ला कमीटी, महिला दक्षता समिती, डी जे चालक मालक, यांची पोलीस ठाणे आवारात बैठक घेण्यात आली. त्यांना उत्सवा दरम्यान घ्यावायाची दक्षता याबाबत सुचना देवून मागर््दर्शन करण्यात आले. सरदवेळी वपोन िसाो, पोनि जनसंपर्क , पोनि प्रशासन तसे इतर अधिकररी अंमदादर हजर होते. तसेच 150 ते 200 नवरात्री मंडळांचे पदाधिकरी हजर होते.
२०-ऑगस्ट-२०२५
पोलीस ठाणे हद्दीतील सर्व गणपती उत्सव मंडळे, मोहल्ला कमीटी, महिला दक्षता समिती, डी जे चालक मालक, यांची पोलीस ठाणे आवारात बैठक
दिनांक 20/08/2025 रोजी नेहरूनगर पोलीस ठाणे येथे पोलीस ठाणे हद्दीतील सर्व गणपती उत्सव मंडळे, मोहल्ला कमीटी, महिला दक्षता समिती, डी जे चालक मालक, यांची पोलीस ठाणे आवारात बैठक घेण्यात आली. त्यांना उत्सवा दरम्यान घ्यावायाची दक्षता याबाबत सुचना देवून मागर््दर्शन करण्यात आले. सरदवेळी वपोन िसाो, पोनि जनसंपर्क , पोनि प्रशासन तसे इतर अधिकररी अंमदादर हजर होते. तसेच 100 ते 150 गणपती मंडळांचे पदाधिकरी हजर होते.
१९-सप्टेंबर-२०२५
सायबर व मिसींग पथकाने केलेली चांगली कामगीरी
आज रोजी आम्ही पोलीस उप निरीक्षक सूर्यगंध, सायबर अधिकारी, नेहरूनगर पोलीस ठाणे दिवसपाळी कर्तव्यावर असताना तक्रादार नामे कपिल झवेरी, वय 39 वर्षे, रा ठी. रूम क्र 1306, बिल्डिंग क्र 136, नेहरूनगर, कुर्ला पूर्व, मुंबई हें त्याची तक्रार देणेकामी पोलीस ठाणेस आले असता त्यांच्याकडे विचारपूस केली असतान त्यांनी असे सांगितले की तुमची नामे अकाक्षा डांगळे वय 28 वर्षे या शिक्षणासाठी स्कॉटलंड येथे रहात आहेत त्यांना लागणार साहित्य उदा कपडे, ग्रोसरी व इतर साहित्य कुरिअर मार्फत स्कॉटलड येथे पाठविण्याचे असल्याने त्यांनी जस्ट डाईल वरती कुरियर सर्व्हिस साठी inquiry केली असता त्यांना एक मोबाईल क्र 8707501356 नाव ankit याचा नंबर भेटला असता सदर नंबर वरती कॉल केला असता त्यांनी ते के के एक्सप्रेस कुरिअर, अंधेरी, मुंबई येथून बोलत असल्याचे सांगितले त्यांनी तक्रारदार यांचे पार्सल स्कॉटलंड येथे पाठविण्याकरिता रक्कम रुपये 41400/- खर्च लागेल असे सांगितले असता तक्रारदार यांनी त्यांना सदर व्यव्हार करिता तयार झाले असता दि. 18/09/2025 रोजी दुपारी 12. 00 एक इसम तक्रारदार यांचे घरी येऊन तक्रारदार यांचे साधारण साधारण किमत 1 लाख 10 हजार चें साहित्य सदर अनोळखी इसम घेऊन गेला त्यानंतर तक्रादार यांना दिवसभरात कुरियर बाबत काहीच अपडेट न भेटल्याने तक्रादार हे पोलीस ठाणेस आले असता त्यांनी असे ही सांगितले की त्यांचे नातेवाईक घोडबंदर येथील इसम नामें संजीव मनोहर देशनेहरे यांचे पण पार्सल लंडन येथे राहणारा त्याच्या मुलास पाठवीन्यासाठी के के कुरिअर चा माणूस पार्सल घेण्याकरिता येणार असल्याची माहिती प्राप्त झाली असता सदरची माहिती दिवसपाळी पर्यंवेक्षक् पो नि पालवे सर तसेच पो नि टिकेकरसर तसेच व पो नि पोपळघट सर यांना माहिती देऊन पो उ नि सूर्यगंध, पो उ नि राऊत असे घोडबंदर येथे इसम नामें देशनेहरे यांचे घरी जाऊन संशियत इस्माची वाट पाहत बसलो साधारण पाच वाजता आला असता त्यांच्याकडे चोकशी केली असता त्याने सदरचे पार्सल बोरझो अँप वरून त्यांचे बुकिंग झालेच सांगितले व सदर पार्सल अंधेरी येथे घेऊन जाण्यासाठी के के कुरियर चें अंकित याने सांगितले असता आम्ही सदर रिक्षा मधून रिक्षा चालकास विश्वासात घेऊन प्रथम साकीनाका त्यानंतर अंकित यांचे सांगणेवरून अंधेरी येथे dhl कुरिअर येथे गेलो असता अंकित यांचे मोबाईल क्र चें लोकेशन घेतले असता त्याचे लोकेशन उत्तर प्रदेश राज्यातील दिसून आले असता सदर इसम फ्राऊंड असल्याचे लक्षात आल्याने त्याचा अधिक तांत्रिक तपास केला असता त्याने सदरचे पार्सल मुलुंड पूर्व येथील साई सागर पॅकर्स अँड मुव्हर्स, नाव नितेश गुप्ता यांचा मोबाईल क्र 8591508022 हा नंबर मिळाला असता त्यांना कॉल करून वर नमूद प्रमाणे हकीकत सांगितली असता त्यांनी त्यास के के कुरियर अंकित याने फसवले असल्याचे सांगून सदरचें साहित्य त्यांचे रहाते घरी नवघर पहिली गल्ली, मुलुंड पूर्व येथे असल्याचे सांगितले असता आम्ही अंधेरी येथून मुलुंड येथे येऊन गुप्ता यांचे घरी आलो असता तक्रारदार यांचे साहित्याचे सहा बॉक्स मिळून आले ते चेक करून तक्रारदार यांचे ताब्यात सुखरूप देण्यात आले.