×

वृत्तांकन


प्रसिद्धी दिनांक
बातमीचे शीर्षक
वृत्त माध्यम
बातमी

१२-एप्रिल-२०२५

"मानवी तस्करीच्या गुन्हयामधील महिला आरोपीतास हुबळी, कलकत्ता, पश्चिम बंगाल येथे अटक करून दोन अल्पवयीन बळीत मुलांची सुटका केलेबाबत......"

"मानवी तस्करीच्या गुन्हयामधील महिला आरोपीतास हुबळी, कलकत्ता, पश्चिम बंगाल येथे अटक करून दोन अल्पवयीन बळीत मुलांची सुटका केलेबाबत......" दिनांक ०५/०८/२०२४ रोजी वडाळा टी.टी. पोलीस ठाणे, मुंबई येथे इसम नामे अमर धिरेन सरदार, वय-६५ वर्षे, व्यवसाय हाऊस किपींग, रा.ठी. विजयनगर, अॅन्टॉप हिल, मुंबई यांनी त्यांचा जावई अनिल पूर्वय्या व नातू बळीत बालक हरवल्याबाबतची तक्रार दिलेली होती. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मोठ्या हरवलेल्या व्यक्ती नोंद क्रमांक १२६/२०२४ अन्वये नोंद करून चौकशी केली असता इसम नामे अनिल पुर्वय्या याने त्याच्या ०२ वर्षाच्या बळीत मुलास आस्मा शेख, शरीफ शेख व आशा पवार यांच्या मदतीने १,६०,०००/-रूपयांना विकी केल्याचे स्पष्ट झालेले होते. म. पोउपनि सिमा काशीनाथ खंडागळे यांनी सरकारतर्फे फिर्यादी दिल्याने दिनांक २१/०८/२०२४ रोजी गु.र.क ६२३/२०२४ कलम १४३(१) (३) (४) (५) भा. न्या. सं सह ८१ जे. जे अॅक्ट अन्वये आरोपी अनिल पुर्वया, आस्मा शेख, शरीफ शेख व आशा पवार यांच्याविरूध्द गुन्हा नोंद करण्यात होता. सदर गुन्हयाच्या तपासामध्ये आरोपी अनिल पुर्वव्या व आरोपी आस्मा शेख यांना मुंबई येथून अटक करण्यात आली आहे. त्यांचेकडे करण्यात आलेल्या तपासामध्ये आरोपी आशा पवार हिचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आरोपी आशा पवार हिस हैद्राबाद येथून अटक करण्यात आलेली आहे. दिनांक ०९/०७/२०२४ रोजी आशा पवार हिने आस्मा शेख, शरीफ शेख यांच्या मदतीने बळीत मुलास भुवनेश्वर रेल्वे स्टेशन, ओडिशा येथे रश्मी नामक महिलेला विकी केल्याचे सांगुन तिच्याबाबत अधिक माहिती नसल्याचे सांगितले. अटक आरोपी आशा पवार हिच्याकडून रश्मीबददल प्राप्त झालेल्या माहितीचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. तांत्रिक विश्लेषणावरुन यातील पाहिजे आरोपी हाय टेक डॅन्टल हॉस्पीटल, भुवनेश्वर येथे काम करत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने दिनांक ०५/०४/२०२५ रोजी पोलीस पथक रवाना झाले. हाय टेक डेन्टल हॉस्पीटल, भुवनेश्वर येथे जावून तपास केला असता, सदरची पाहिजे आरोपीत ही सध्या सम-०२ हॉस्पीटल कटक, भुवनेश्वर येथे करत असल्याची माहिती प्राप्त झाली. सम-०२ हॉस्पीटल कटक, भुवनेश्वर येथे जावून पथकाने तपास केले असता, त्याठिकाणचे काम सोडून ती निघून गेल्याची माहिती प्राप्त झाली. तसेच तेथून पाहिजे आरोपीताची अधिक माहिती घेवून तांत्रिक विश्लेषणावरुन पाहिजे आरोपी रश्मी बॅनर्जी ही जिल्हा हुबळी, कोलकत्ता, राज्य-प. बंगाल येथे असल्याचे निष्पन्न झाले. दिनांक ०९/०४/२०२५ रोजी उत्तरपारा पोलीस ठाणे, हुबळी, प. बंगाल येथील स्थनिक पोलीसांच्या मदतीने प्राप्त पत्त्यावर शोध घेतला असता, येथे गुन्हयातील बळीत मुलगा व साधारणतः ०३ वर्षाच्या अनोळखी मुलीसह मिळून आलेली होती. आरोपी रेश्मा संतोषकुमार बॅनर्जी, वय-४३ वर्षे, व्यवसाय दंत चिकीत्सक हिस मा. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, सेरामपूर यांचेसमक्ष हजर करून ट्रॉझिट रिमांड घेण्यात आले होते. तसेच गुन्हयातील बळीत मुलास व ०३ वर्षाच्या अनोळखी मुलीस बाल कल्याण समिती, हुबळी यांचेसमक्ष हजर केले असता गुन्हयातील बळीत मुलाचा ताबा तपास पथकास देण्यात आला होता. तसेच अनोळखी बळीत मुलीस बालगृहात ठेवण्यात आले आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करून अटक आरोपी व बळीत मुलास दिनांक १२/०४/२०२५ रोजी वडाळा टी.टी. पोलीस ठाणे, येथे आणण्यात आलेले आहे. सदर बळीत मुलाचे अंगावर जखमांच्या खुणा दिसून येत असल्याने त्यास अधिक उपचाराकरिता हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलेले आहे. यातील आरोपीताने बळीत मुलांस मारहाण केलेली असून त्याअनुषंगाने जे. जे. अॅक्ट कलम ७५ अन्वये कलम वाढ करण्यात आलेली आहे. सध्याची कामगिरी मा. विवेक फणसाळकर, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई; देवेन भारती, विशेष पोलिस आयुक्त, बृहन्मुंबई; सत्यनारायण चौधरी सीनियर, सहयोगी पोलिस आयुक्त, (C&S), बृहन्मुंबई; अनिल पारसकर, अप्पर पोलीस आयुक्त, मध्य प्रादेशिक विभाग, मुंबई; रागसुथा आर, पोलीस उपायुक्त, परिमंडळ, 04, माटुंगा, मुंबई, मा. शैलेंद्र धिवार, सहायक पोलिस आयुक्त, सायन विभाग, मुंबई; रमेश जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वडाळा टी.टी.पोलीस स्टेशन, मुंबई, यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ. अनुराधा भोसले (गुन्हे), पो.पो. ०१२२/अंग्राक, पो.शि. a 110351/शिंदे, M.Po. शि.के. 216469/मुरकुटे.