उपक्रम
बेटी बचाओ बेटी पढाओ उपक्रम
दि 07/02/2025 रोजी मुलुंड पोलीस ठाणे, मुंबई तर्फे बेटी बचाओ बेटी पढाओ उपक्रम रावविण्यात आला. सदर उपक्रमात मा.पोलीस उपआयुक्त परिमंडळ 7, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त,मुलंड विभाग, मुंबई, वरिश्ठ पोलीस निरीक्षक, मुलुंड पोलीस ठाणे, मुंबई तसेच मुलुंड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार विषेशतः महिला पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. यामध्ये मुलुंड पोलीस ठाणे हददीत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते व मुुलींचे समाजातील महत्व, त्यांची प्रगती, त्यांचे षिक्षणाचे महत्त्व इ.बाबत जनजागृती करण्यात आली.
पोलीस दिदी कार्यक्रम
मुक्ता साळवे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वस्तीगृह,*जे एन रोड, मुलुंड प, मुंबई येथील एक वॉर्डन व 0 4 ते 05 मुली यांची निर्भया पथक यांनी मिटींग घेतली . यावेळी त्यांना खालील मुद्दयावर मार्गदर्शन केले. 1) महिला व बालक यांचे गुन्हयाविषयी माहिती 2) लैंगिक शोषण 3)लहान मुलांबाबत घ्यावयाची काळजी 4)सायबर क्राईम 5) मौल्यवान वस्तू व मोबाईल चोरी 6)ऑनलाईन फ्रॉड तसेच कलकत्ता येथे घडलेल्या प्रकारच्या अनुषंगाने काळजी व दक्षता घेणेबाबात सूचना देण्यात आल्या. पोलीस मदतीसाठी पोलीस हेल्पलाइन नंबर 100, 103 व 1098 तसेच मुलुंड निर्भया पथक मोबाईल क्र. 8591935803 या वर संपर्क करण्याची माहिती देण्यात आली.