×

इतिहास


- २००५

विक्रोळी पोलीस ठाणे

विक्रोळी पोलीस ठाण्याची स्थापना २००५ रोजी झाली असून हे ठाणे पत्ता - विक्रोळी पोलीस स्टेशन, आत्माराम सर्वे मार्ग, कन्नमवार, नगर क्रमांक २, विक्रोळी पूर्व, मुंबई ४०००८३ येथे स्थित आहे. कार्यक्षेत्रात सुमारे ४.७५ लाख लोकसंख्या १७ चौरस किमी क्षेत्रफळामध्ये समाविष्ट आहे. हे पोलीस ठाणे ३ बीट क्षेत्रामध्ये विभागले गेले आहे - हरियाली व्हिलेज बिट चौकी, परेश पारकर मार्केट पोलिस चौकी, कन्नमवार नगर पोलिस चौकी.

मर्मस्थळे - या ठाण्याच्या कार्यक्षेत्रात गोदरेज कंपनी, गोदरेज जेट्टी, टाटा पॉवर हाऊस, अदानी इलेक्ट्रिक सिटी, एमएसईबी जेट्टी चा समावेश होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आणि महात्मा फुले रुग्णालय हे प्रमुख सार्वजनिक रुग्णालय म्हणून काम करत असले तरी, परिसरात आदिआरोग्यम रुग्णालय, गोदरेज रुग्णालय, मोदी रुग्णालय, आस्था रुग्णालय, रुबी रुग्णालय अशी अनेक खाजगी रुग्णालये आहेत.

प्रवासासाठी विक्रोळी रेल्वे स्टेशन, कन्नमवार नगर -२ बस स्थानक आणि विक्रोळी रेल्वे स्टेशनजवळील विक्रोळी बस स्थानक हे मुख्य दळणवळण केंद्र आहेत. विक्रोळी पोलीस ठाणे हे आपल्या शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी नेहमी तत्पर आहे व नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी सज्ज आहे.

दूरध्वनी क्रमांक - ०२२ - २५७८२२४०, २५७८६९९१

मोबाईल क्रमांक - ८९७६९४७९६६