×

इतिहास


- १९७५

टिळकनगर पोलीस ठाणे

टिळक नगर पोलीस ठाण्याची स्थापना १९७५ रोजी झाली असून हे ठाणे पत्ता - शांता जोग मार्ग, टिळकनगर, चेंबुर, मुंबई-४०००८९ येथे स्थित आहे. कार्यक्षेत्रात सुमारे ०४ लाख ते ०४ लाख ५० हजार लोकसंख्या ही ६४५७.२२ स्क्वेअर मिटर क्षेत्रफळामध्ये समाविष्ट आहे. टिळक नगर पोलीस ठाणे ०४ बीट क्षेत्रामध्ये विभागले गेले आहे - लोकमान्य टिळक टर्मिनस पोलीस चौकी, छेडानगर पोलीस चौकी, पी.एल.लोखंडे मार्ग पोलीस चौकी आणि सोमया काॅलेज पोलीस चौकी.

टिळक नगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सोमया काॅलेज, सहयाद्री गार्डन, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि आदानी इलेक्ट्रीसिटी यांसारखी अनेक महत्त्वाची ठिकाणे यांचा समावेश होतो. याशिवाय राजावाडी रूग्णालय हे प्रमुख सरकारी रुग्णालय तर राणे हाॅस्पीटल, संजीवणी हाॅस्पीटल, एस.आर.व्ही. हाॅस्पीटल आणि दोषी हाॅस्पीटल इत्यादी खाजगी रुग्णालये येथे उपलब्ध आहेत. धर्मस्थळांमध्ये महालक्क्ष्मी मंदिर, तिरुचेम्बूर मुरुगन मंदिर आणि ओम षिव साई मंदिर हे महत्त्वाचे आहे.

टिळक नगर पोलीस ठाणे येथे प्रवासासाठी टिळक नगर, चेंबूर, विद्याविहार आणि लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्थानक हे मुख्य दळणवळण केंद्र आहेत. टिळक नगर पोलीस ठाणे हे आपल्या शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी नेहमी तत्पर आहे व नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी सज्ज आहे.

दूरध्वनी क्रमांक - ०२२-२५२२९३४५

मोबाईल क्रमांक - ८९७६९४७९६३