इतिहास
- १९७८
साकीनाका पोलीस ठाणे
साकीनाका पोलीस ठाण्याची स्थापना ०१/१०/१९७८ रोजी झाली असून हे ठाणे पत्ता - क्रिस्टल बिल्डिंग पहिला मजला, आध्या क्रांतीकारक वसताद क्रांतीगुरू लहुजी साळवे ठडब मैदानासमोर, विजय फायर रोड संघर्षनगर, साकीनाका, मुंबई ७२ येथे स्थित आहे. कार्यक्षेत्रात सुमारे ११,७५,००० लोकसंख्या ११ चौरस किमी क्षेत्रफळामध्ये समाविष्ट आहे. हे पोलीस ठाणे ४ बीट क्षेत्रामध्ये विभागले गेले आहे - संघर्ष नगर बिट चौकी, मोहाली विपेज बिट चौकी, काजुपाडा बिट चौकी, जरीमारी बिट चौकी.
मर्मस्थळे - या ठाण्याच्या कार्यक्षेत्रात हॉलिडे इन हॉटेल, साकीनाका मेट्रो स्टेशन, असल्फा मेट्रो स्टेशन, रफिक नगर टेकडी, विमानतळ भिंत, पेनिन्सुला हॉटेल, बूमरंग चा समावेश होतो. महानगरपालिका क्लिनिक आणि महानगरपालिका मॅटर्निटी होम हे प्रमुख सार्वजनिक रुग्णालय म्हणून काम करत असले तरी, परिसरात आशीर्वाद रुग्णालय, सपना रुग्णालय, पॅरामाउंट रुग्णालय, प्रियांका रुग्णालय, एजी तिवारी रुग्णालय, वर्धमान रुग्णालय, धन्वंतरी रुग्णालय, जे पी रुग्णालय अशी अनेक खाजगी रुग्णालये आहेत.
प्रवासासाठी साकीनाका मेट्रो स्टेशन आणि अल्फासा मेट्रो स्टेशन हे मुख्य दळणवळण केंद्र आहेत. साकीनाका पोलीस ठाणे हे आपल्या शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी नेहमी तत्पर आहे व नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी सज्ज आहे.
दूरध्वनी क्रमांक - ०२२-२८४७४४११, २८४७६१६०
मोबाईल क्रमांक - ८९७६९५२०४५
- २०२३