इतिहास
- २००२
पवई पोलीस ठाणे
पवई पोलीस ठाण्याची स्थापना ०३ डिसेंबर २००२ रोजी झाली असून हे ठाणे पत्ता - आदि शंकराचार्य मार्ग, रामबाग, पवई लेक जवळ, पवई, मुंबई ४०००७६ येथे स्थित आहे. कार्यक्षेत्रात सुमारे ७ कोटी लोकसंख्या १६ चौरस किमी क्षेत्रफळामध्ये समाविष्ट आहे. पवई पोलीस ठाणे ४ बीट क्षेत्रामध्ये विभागले गेले आहे - पवई गार्डन, मोरारजी नगर, तुंगा गाव, आय टी मेनगेट.
मर्मस्थळे - या ठाण्याच्या कार्यक्षेत्रात पवई तलाव, आय आय टी, आय आय एम, समावेश होतो. या परिसरात डॉ. एल. एच. हिरानंदानी रुग्णालय, पवई पॉलीक्लिनिक, निहाल नर्सिंग होम, एस. बी. नर्सिंग होम अशी अनेक खाजगी रुग्णालये आहेत.
प्रवासासाठी अंधेरी रेल्वे स्टेशन (८ किमी), कांजूरमार्ग रेल्वे स्टेशन (५ किमी), घाटकोपर रेल्वे स्टेशन (६ किमी) आणि हिरानंदानी बस डेपो हे मुख्य दळणवळण केंद्र आहेत. पवई पोलीस ठाणे हे आपल्या शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी नेहमी तत्पर आहे व नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी सज्ज आहे.
दूरध्वनी क्रमांक - ०२२-२५७०२६९०
मोबाईल क्रमांक - ८९७६९५२०४६