×

History


- १९९१

पार्कसाईट पोलीस ठाणे

पार्कसाईट पोलीस ठाण्याची स्थापना १९९१ रोजी झाली असून हे ठाणे पत्ता - पार्कसाईट पोलीस स्टेशन, एस व्ही रोड, खार, मुंबई - ४०००५२ येथे स्थित आहे. कार्यक्षेत्रात सुमारे ४-४.५ लोकसंख्या १४ चौ. किमी क्षेत्रफळामध्ये समाविष्ट आहे. पार्कसाईट पोलीस ठाणे ४ बीट क्षेत्रामध्ये विभागले गेले आहे - कांजूरमार्ग रेल्वे स्टेशन पोलिस चौकी, विक्रोळी रेल्वे स्टेशन पोलिस चौकी, अमृतनगर पोलिस चौकी, बि. क्रमांक १४.

मर्मस्थळे - या ठाण्याच्या कार्यक्षेत्रात रोड क्रमांक १ पाण्याची टाकी, महानगर टेलिफोन एक्सचेंज चा समावेश होतो. या परिसरात सपना हॉस्पिटल, समर्थ हॉस्पिटल, आदर्श हॉस्पिटल, सत्यम हॉस्पिटल, अमृतनगर नर्सिंग होम, डॉ. लोखंडे हॉस्पिटल सारखी अनेक खाजगी रुग्णालये आहेत.

प्रवासासाठी विक्रोळी रेल्वे स्टेशन आणि कांजूरमार्ग रेल्वे स्टेशन आणि विक्रोळी बेस्ट बस डेपो हे मुख्य दळणवळण केंद्र आहेत. पार्कसाईट पोलीस ठाणे हे आपल्या शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी नेहमी तत्पर आहे व नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी सज्ज आहे.

दूरध्वनी क्रमांक - ०२२-२५७८६५१८, २५७७५३३९, २५७८७१०१, २५७८९३६८

मोबाईल क्रमांक - ८९७६९४७९६७