इतिहास
- १९९३
मेघवाडी पोलीस ठाणे
मेघवाडी पोलीस ठाण्याची स्थापना १९९३ रोजी झाली असून हे ठाणे पत्ता - मेघवाडी पोलिस स्टेशन, आयकर कॉलनी, मेघवाडी, जोगेश्वरी पूर्व, मुंबई - ४०००६० येथे स्थित आहे. कार्यक्षेत्रात सुमारे ५,५४,३०० लोकसंख्या ३.५ चौ. किमी क्षेत्रफळामध्ये समाविष्ट आहे. मेघवाडी पोलीस ठाणे ४ बीट क्षेत्रामध्ये विभागले गेले आहे - जनशक्ती बिट चौकी, झुला मैदान बिट चौकी, श्याम तलाव बिट चौकी, शेर ए पंजाब बिट चौकी.
मर्मस्थळे - या ठाण्याच्या कार्यक्षेत्रात मेहबूबिया सुबानी मस्जिद, गाझीबाबा दर्गा, रहमानिया मस्जिद, बैलबाजार चौकी, श्रद्धा जंक्शन, टाटा पॉवर, अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बे, अदानी रिलायन्स एनर्जी, उदंचन केंद्र चा समावेश होतो. सुश्रीता रुग्णालय आणि महानगरपालिका आरोग्य केंद्र हे प्रमुख सार्वजनिक रुग्णालय म्हणून काम करत असले तरी, या परिसरात भावे नर्सिंग होम, भानुशाली नर्सिंग होम अशी अनेक खाजगी रुग्णालये आहेत.
प्रवासासाठी जोगेश्वरी रेल्वे स्टेशन आणि मजास बस आगार हे मुख्य दळणवळण केंद्र आहेत. मेघवाडी पोलीस ठाणे हे आपल्या शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी नेहमी तत्पर आहे व नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी सज्ज आहे.
मोबाईल क्रमांक - ८९७६९५२०४३