×

इतिहास


- १९८५

एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे

एमआयडीसी पोलीस ठाण्याची स्थापना १९८५ रोजी झाली असून हे ठाणे पत्ता - एमआयडीसी पोलिस स्टेशन, सेंट्रल रोड, कामगार रुग्णालयाजवळ, एमआयडीसी अंधेरी पूर्व, मुंबई-४०००९३ येथे स्थित आहे. कार्यक्षेत्रात सुमारे ५ लाख लोकसंख्या १५ चौरस किमी क्षेत्रफळामध्ये समाविष्ट आहे. हे पोलीस ठाणे ४ बीट क्षेत्रामध्ये विभागले गेले आहे - हंजनगर बिट चौकी, सुभाषनगर बिट चौकी, मरोळ बिट चौकी, तक्षशीला बिट चौकी.

मर्मस्थळे - या ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सीप्झ औद्योगिक केंद्र, सेव्हनहिल हॉस्पिटल, अदानी इलेक्ट्रिसिटी कार्यालय, वेरावली जलाशय, महानगर टेलिफोन एक्सचेंज, मरोळ बस आगार, पॉवर ग्रिड स्टेशन चा समावेश होतो. सेव्हनहिल हॉस्पिटल, कामगार हॉस्पिटल हे प्रमुख सार्वजनिक रुग्णालय म्हणून काम करत असले तरी, परिसरात होली स्पिरिट हॉस्पिटल सारखी अनेक खाजगी रुग्णालये आहेत.

प्रवासासाठी अंधेरी रेल्वे स्टेशन आणि मरोळ बस डेपो हे मुख्य दळणवळण केंद्र आहेत. एमआयडीसी पोलीस ठाणे हे आपल्या शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी नेहमी तत्पर आहे व नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी सज्ज आहे.

दूरध्वनी क्रमांक - ०२२-२८३६८३५२, २८३९४०५

मोबाईल क्रमांक - ८९७६९५२१५०