इतिहास
- १९५७
भांडुप पोलीस ठाणे
भांडुप पोलीस ठाण्याची स्थापना १९५७ रोजी झाली असून हे ठाणे पत्ता - लेक रोड, मधुबन गार्डन जवळ, मुंबई - ४०००७८ येथे स्थित आहे. कार्यक्षेत्रात सुमारे ०७ लाख ६५ हजार ७५० लोकसंख्या ही २.४ चौ.किमी क्षेत्रफळामध्ये समाविष्ट आहे. भांडुप पोलीस ठाणे ०४ बीट क्षेत्रामध्ये विभागले गेले आहे - सोनापूर पोलीस बिट चौकी, व्हिलेज रोड पोलीस बिट चौकी, टेंबीपाडा पोलीस बिट चौकी, एकता पोलीस बिट चौकी.
मर्मस्थळे - या ठाण्याच्या कार्यक्षेत्रात टाटा पॉवर, वरची पाण्याची टाकी रमाबाई नगर, सीएट टायर कंपनी, आणि मनोरंजन मैदान जपानी गार्डन यांसारखी अनेक महत्त्वाची ठिकाणे यांचा समावेश होतो. याशिवाय सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, भांडुप हे प्रमुख सरकारी रुग्णालय तर फोर्टीज रूग्णालय, नवकार रूग्णालय, बडवाईक रूग्णालय आणि भाटीया रूग्णालय इत्यादी खासगी रुग्णालये येथे उपलब्ध आहेत.
प्रवासासाठी भांडुप आणि नाहूर रेल्वे स्थानक हे मुख्य दळणवळण केंद्र आहेत. भांडुप पोलीस ठाणे हे आपल्या शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी नेहमी तत्पर आहे व नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी सज्ज आहे.
दूरध्वनी क्रमांक - ०२२-२५९५२१७१/२५९५८६०७/२५९६७१०६ आणि २५९६१९७१
मोबाईल क्रमांक - ८९७६९४७९६८