×

इतिहास


- १९९४

शिवाजी पार्क पोलीस ठाणे,

शिवाजी पार्क पोलीस ठाण्याची स्थापना ११/०६/१९९४ रोजी झाली असून हे ठाणे पत्ता - शिवाजी पार्क पोलीस स्टेशन, राम मारुती रोड, दादर पश्चिम, मुंबई २८ येथे स्थित आहे. कार्यक्षेत्रात सुमारे २,२६,५२६ लोकसंख्या ३.७ चौरस किमी क्षेत्रफळामध्ये समाविष्ट आहे. शिवाजी पार्क पोलीस ठाणे ४ बीट क्षेत्रामध्ये विभागले गेले आहे - उद्यान गणेश पोलीस चौकी, गडकरी पोलीस चौकी, चैत्यभूमी पोलीस चौकी, दादर रेल्वे स्टेशन पोलीस चौकी.

मर्मस्थळे - या ठाण्याच्या कार्यक्षेत्रात शिवसेना भवन, महानगर टेलिफोन निगम मुख्य कार्यालय, माहिम उदंचन केंद्र, बेस्ट रिसीव्हिंग स्टेशन, चैत्यभूमी, इंदू मिल, बाळासाहेब ठाकरे स्मारक, वीर सावरकर राष्ट्रीय स्मारक चा समावेश होतो, . या परिसरात ठाकूर हॉस्पिटल, धन्वंतरी हॉस्पिटल, डॉ. पुरंदरे मॅटर्निटी होम, निर्मल नर्सिंग होम, पाटकर नर्सिंग होम, सुश्रुषा को. ऑ. सिटीझन्स हॉस्पिटल लिमिटेड, अश्विनी नर्सिंग मॅटर्निटी होम, डॉ. वेद हॉस्पिटल, शुश्रीशा हॉस्पिटल अशी अनेक खाजगी रुग्णालये आहेत.

प्रवासासाठी दादर रेल्वे स्टेशन आणि माटुंगा रेल्वे स्टेशन हे मुख्य दळणवळण केंद्र आहेत. शिवाजी पार्क पोलीस ठाणे हे आपल्या शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी नेहमी तत्पर आहे व नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी सज्ज आहे.

दूरध्वनी क्रमांक - ०२२-२४३७०६४१

मोबाईल क्रमांक - ८९७६९४७२३४