×

इतिहास


- २००६

शाहुनगर पोलीस ठाणे

विनोबा भावे नगर पोलीस ठाण्याची स्थापना १६/१२/२००६ रोजी झाली असून हे ठाणे पत्ता - विनोबा भावे नगर पोलिस स्टेशन, विनोबा भावे नगर, कुर्ला पश्चिम, मुंबई येथे स्थित आहे. कार्यक्षेत्रात सुमारे ५ लाख लोकसंख्या ४.५ चौ. किमी क्षेत्रफळामध्ये समाविष्ट आहे. विनोबा भावे नगर पोलीस ठाणे ३ बीट क्षेत्रामध्ये विभागले गेले आहे - एलआयजी बिट चौकी, मसरानी इस्टेट बिट चौकी, बैलबाजार चौकी.

मर्मस्थळे - या ठाण्याच्या कार्यक्षेत्रात मेहबुबिया सुबानी मस्जिद, गाजीबाबा दर्गा, रहमानिया मस्जिद, बैलबाजार चौकी, श्रद्धा जंक्शन, अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बे, टाटा पॉवर, अदानी रिलायन्स एनर्जी, उदंचन सेंटर चा समावेश होतो. या परिसरात क्रिटिकेअर हॉस्पिटल, प्रीमियर रोड हॉस्पिटल अशी अनेक खाजगी रुग्णालये आहेत.

प्रवासासाठी कुर्ला रेल्वे स्टेशन, टिळकनगर रेल्वे स्टेशन, बैलबाजार बस स्टॉप, कल्पना टॉकीज बस स्टॉप हे मुख्य दळणवळण केंद्र आहेत. विनोबा भावे नगर पोलीस ठाणे हे आपल्या शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी नेहमी तत्पर आहे व नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी सज्ज आहे.

दूरध्वनी क्रमांक - ०२२-२६५०००२५, ९३२४९९९२४५

मोबाईल क्रमांक - ८९७६९४७९५१