×

इतिहास


- १९८२

अँन्टॅाप हिल पोलीस ठाणे

अँटॉप हिल पोलीस ठाण्याची स्थापना ०१/१२/१९८२ रोजी झाली असून हे ठाणे पत्ता - अँटॉप हिल पोलिस स्टेशन, बी नंबर २२९, सेक्टर ६, सी जी एस कॉलनी, अँटॉप हिल, मुंबई - ३७ येथे स्थित आहे. कार्यक्षेत्रात सुमारे ५,५०,००० लोकसंख्या ४.११ चौरस किमी क्षेत्रफळामध्ये समाविष्ट आहे. हे पोलीस ठाणे ४ बीट क्षेत्रामध्ये विभागले गेले आहे - रावली कॅम्प बिट चौकी, पंजाबी कॅम्प बिट चौकी, कोकरी आगर बिट चौकी, शेख मिस्री बिट चौकी.

मर्मस्थळे - या ठाण्याच्या कार्यक्षेत्रात बौद्धिक संपदा भवन, रावळी उच्छस्तर जलाशय, बेस्ट रिसीव्हिंग सेंटर, रावळी उडांचन सेंटर, अँटॉप हिल जंक्शन, बंगलीपुरा ट्रान्झिट कॅम्प, कोकरी आगर जंक्शन, मक्कावाडी जंक्शन चा समावेश होतो. या परिसरात साई हॉस्पिटल, पूजा हॉस्पिटल, अँटॉप हिल हॉस्पिटल, केनी हॉस्पिटल, गॅलेक्सी हॉस्पिटल, संजीवनी मेडिकल सेंटर अशी अनेक खाजगी रुग्णालये आहेत.

प्रवासासाठी भायखळा रेल्वे स्टेशन, संध्रुस्ट रोड रेल्वे स्टेशन, जे जे जंक्शन बस स्टॉप, ए एच अन्सारी चौक बस स्टॉप, श्रीराम राणे चौक बस स्टॉप आणि भेंडी बाजार बस स्टॉप हे मुख्य दळणवळण केंद्र आहेत. अँटॉप हिल पोलीस ठाणे हे आपल्या शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी नेहमी तत्पर आहे व नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी सज्ज आहे.

दूरध्वनी क्रमांक - ०२२ - २४०७१७८४, २४०७४४४७

मोबाईल क्रमांक - ८९७६९४७२३१