×

History


- १९८५

जुहू पोलीस ठाणे

जुहू पोलीस ठाणे हे महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक ए. पी.ओ. ३१८९/१८५०-६(७०)पोल-३ मंत्रालय मुंबई दिनांक १५/०२/१९८३ चे आदेशानुसार दिनांक ०१/०५/१९८५ पासुन कार्यरत झाले होते. जुहू पोलीस ठाणे हे सदर वेळी शासकीय जागा उपलब्ध नसल्याने मिठीबाई काॅलेज समोर व्हीएम रोड येथे विष्णु प्रसाद हाॅल इमारतीचे तळ मजल्यातील ३० बाय ३० च्या जागेत सुरु करण्यात आले होते. सदर जागा ही केळवाणी मंडळ जुहू यांच्या मालकीची होती. त्यामुळे सदरची जागा ही भाडेतत्वावर घेतली होती.

महाराष्ट्र शासनाने व्ही.एम. रोड कलानिकेतनच्या बाजुला जागा घेवून सदर ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जुहू पोलीस ठाणेची नवीन एक मजली इमारत बांधुन दिली व सदर इमारतीत जुहू पोलीस ठाणे हलविण्यात येऊन दिनांक ०१/०५/२००० पासुन जुहू पोलीस ठाणे सदर ठिकाणी कार्यरत आहे.

जुहू पोलीस ठाणे हद्दीत हरेराम हरेकृष्ण मंदिर व मुक्तेश्वर मंदिर असे हिंदु धर्मियांचे महत्वाचे मंदिर आहेत. तसेच जुहू पोलीस ठाणेच्या पश्चिमेस अरबी समुद्र लागुन असुन बिर्लालेन चौपाटी, हाॅलीडे ईन चौपाटी, गोदरेज चौपाटी व गांधीग्राम चौपाटी अशा चार समुद्र चौपाटया आहेत.