इतिहास
- १९२४
भोईवाडा पोलीस ठाणे
भोईवाडा पोलीस ठाण्याची स्थापना १९२४ रोजी झाली असून हे ठाणे पत्ता - भोईवाडा पोलिस स्टेशन, सदाकांत धवन मैदानासमोर, खाशाबा जाधव रोड, भोईवाडा, मुंबई - ४०००१२ या पत्त्यावर आहे येथे स्थित आहे. कार्यक्षेत्रात सुमारे ४.१० लाख लोकसंख्या ४.०७ चौरस किमी क्षेत्रफळामध्ये समाविष्ट आहे. हे पोलीस ठाणे ४ बीट क्षेत्रामध्ये विभागले गेले आहे - तकिया मस्जिद बिट चौकी, परळ टी टी जंक्शन बिट चौकी, गांधी चौक बिट चौकी, हिंदमाता बिट चौकी.
मर्मस्थळे - या ठाण्याच्या कार्यक्षेत्रात आय.टी.सी. हॉटेल, टाटा हॉस्पिटल, वाडिया हॉस्पिटल, के.ई.एम. हॉस्पिटल, हाफकिन इन्स्टिट्यूट, आयकर कार्यालय, नायगाव पोलिस मुख्यालय चा समावेश होतो. तर के.ई.एम. रुग्णालय, नौरोजी वाडिया प्रसूती रुग्णालय, खा.ब. हाजी बच्चुअली धर्मादाय रुग्णालय, टाटा मेमोरियल सेंटर व रुग्णालय, नायगाव पोलिस रुग्णालय, रामकुवर क्षय रुग्णालय, नायगाव प्रसूतीगृह दवाखाना हे प्रमुख सार्वजनिक रुग्णालय म्हणून काम करते, परिसरात ग्लोबल हॉस्पिटल, परळ हॉस्पिटल, स्पर्श हॉस्पिटल, संजीवनी हॉस्पिटल, मारु हॉस्पिटल अशी अनेक खाजगी रुग्णालये आहेत.
प्रवासासाठी परेल रेल्वे स्टेशन हे मुख्य दळणवळण केंद्र आहेत. भोईवाडा पोलीस ठाणे हे आपल्या शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी नेहमी तत्पर आहे व नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी सज्ज आहे.
दूरध्वनी क्रमांक - ०२२-२०८४७२७८, २४१४४२२०
मोबाईल क्रमांक - ८९७६९४७२२५