×

इतिहास


- २०२१

बांगुर नगर पोलीस ठाणे

रबांगुरनगर लिंक रोड पोलीस ठाण्याची स्थापना २०२१ रोजी झाली असून हे ठाणे पत्ता - एमटीएनएल टेलिफोन एक्सचेंज बिल्डिंग, ग्राउंड फ्लोअर आणि पहिला मजला, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्युनिसिपल गार्डनच्या समोर, बॅक रोड, गोरेगाव, (पश्चिम) मुंबई - ६२ येथे स्थित आहे. कार्यक्षेत्रात सुमारे ५ लाख लोकसंख्या ही २८.६ चौ. किमी क्षेत्रफळामध्ये समाविष्ट आहे. हे पोलीस ठाणे ०४ बीट क्षेत्रामध्ये विभागले गेले आहे - भगतसिंग नगर क्र. १,२,३ बिट चौकी, लक्ष्मी नगर बिट चौकी, इंटरफेस बिल्डिंग बिट चौकी आणि मुत्तुमारी नगर बिट चौकी.

मर्मस्थळे - या ठाण्याच्या कार्यक्षेत्रात गोरेगाव उद्यानचन सेंटर, चिंचोली अग्निशमन दल, मालाड बस डेपो असे अनेक महत्त्वाची ठिकाणे आहेत. विनायक मॅटर्निटी हॉस्पिटल, डायमंड हॉस्पिटल, एव्हरशाईन ऑर्थोपेडिक सर्जन, स्नेहा जनरल नर्सिंग होम, एव्हरशाईन नर्सिंग होम, चिल्ड्रन हॉस्पिटल आणि मॉडर्न पॉली क्लिनिक, डॉ. पगरूल हॉस्पिटल, ग्रेस मॅटर्निटी नर्सिंग होम ई आणि टीआय हॉस्पिटल, अल्टीज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, क्रिटिकेअर एशिया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि ऑस्कर सुपार स्पेशालिटी हॉस्पिटल हे एक महत्त्वाचे सार्वजनिक रुग्णालय आहे.

मालाड बस डेपो हे प्रवाशांसाठी मुख्य दळणवळण केंद्र आहेत. बांगुरनगर लिंक रोड पोलीस ठाणे हे आपल्या शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी नेहमी तत्पर आहे व नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी सज्ज आहे.

मोबाईल क्रमांक – ८९७६९५२१५२